सचिन बिद्री:उमरगा, उस्मानाबाद
उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील नालंदा मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या चेअरमन पदी सरोजाताई कैलास शिंदे तर सचिव पदी गो.ल. कांबळे यांची तर कोषाध्यक्ष म्हणून रवींद्र डावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रविवारी दि. 30 रोजी प्राधिकृत अधिकारी डी.डी.चिवडे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या नूतन संचालकांची बैठक घेण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक उपस्थित होते.

नालंदा मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली होती.त्यानंतर चेअरमन निवडी करीता प्राधिकृत अधिकारी डी.डी चिवडे यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली.यावेळी संस्थेचे संचालक नागनाथ कांबळे, मत्सेंद्र सरपे, सुभाष काळे, मोहन कांबळे, दयानंद बेळंबकर, वैशाली ढेरे, कैलास शिंदे व तानाजी कांबळे आदींची उपस्थिती होती.यावेळी नूतन अध्यक्षा सरोजाताई शिंदे म्हणाल्या की, “संस्थेच्या विकासासाठी सर्व सभासदांनी एक दिलाने काम करून संस्थेच्या प्रगती करीता सर्वानी सहकार्य करावे” असे आवाहन नूतन चेअरमन सरोजा शिंदे यांनी केले.यावेळी एम. एस. सरपे, माजी अध्यक्ष सुभाष काळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन मोहन कांबळे यांनी केले तर एन. व्ही. कांबळे यांनी आभार मानले.