उस्मानाबाद : उमरगा येथील माजी होमगार्ड कमांडर तथा नगर परिषद कर्मचारी उत्तमराव नारायणराव सगर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दि .३१ रोजी दुःखद निधन झाले .होमगार्ड कमांडर तथा नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून त्यांनी अनेक वर्ष सेवा केली . त्यांच्या पश्चात तीन मुली ,एक मुलगा, पत्नी, नातवंडे असा परिवार आहे . कै .कॉ. विठ्ठल सगर यांचे ते लहान बंधु होत .त्यांचा अंत्यविधी उमरगा येथील हुतात्मा स्मारक येथील स्मशानभुमीत दु .३वा करण्यात आला . यावेळी माजी खासदार रवींद्र गायकवाड, आ .ज्ञानराज चौगुले , कैलास शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .