३५ वर्षे बजावली निस्वार्थी सेवा
समाजहिताची कामे करतांना जनेतेशी नाळ जुळली
पालघर : जव्हार नगर परिषद ही महाराष्ट्रातील सर्वांत जुनी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. शताब्दीपूर्ती करणा-या ह्या नगर परिषदेचा नावलौकिक वाढविण्यांत परिषदेच्या कर्मचा-यांचा मोलाचा वाटा आहे. नगर परिषदेत प्रदीर्घ ३५ वर्षे सेवा केलेले कर्मचारी अखलाख मोहम्मद कोतवाल हे सहाय्यक कर निरीक्षक पदावरुन आज ३१ जानेवारी २०२२ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले .

कोतवाल यांनी आपल्या सेवाकाळात नगर परिषदेच्या जकात निरीक्षक, दिवाबत्ती विभाग प्रमुख, आरोग्य विभाग प्रमुख अशा विविध जबाबदारीच्या पदांवर उल्लेखनीय काम केले आहे. सहाय्यक जकात निरीक्षक या पदावर कार्यरत असतांना सन १९९९ मध्ये उद्दिष्टापेक्षा ३०% पेक्षा जास्त जकात कराची वसुली केल्यामुळे आजहि जव्हार नगर परिषदेस सहाय्यक अनुदानामध्ये वाढीव लाभ मिळत आहे. आरोग्य विभाग प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळतांना शासनाच्या संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान अंतर्गत जव्हार नगर परिषदेस राज्यामधून तिस-या क्रमांकाचे व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ५ कोटी रुपयांचे बक्षिस नगर परिषदेस मिळवून देण्यात कोतवाल यांचा सिंहाचा वाटा आहे. जव्हार नगर परिषदेच्या शताब्दीपूर्ती महोत्सवामध्ये आयोजित केलेले विविध कार्यक्रम पार पाडण्यासाठी कोतवाल यांनी सक्रिय सहभाग घेतला. कोरोना काळात उल्लेखनीय काम केल्याबद्दल अनेक मान्यवरांचे हस्ते त्यांचा गौरव झालेला आहे. प्रशासन व जव्हारकर नागरिक यांचा उत्तम समन्वय साधण्याचे कौशल्य कोतवाल यांचेकडे अंगी असल्याने शहरातील जनतेशी त्यांनी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले आहेत. त्यानिमित्त जव्हार नगर परिषदेतर्फे सेवापूर्ती समारंभाचे आयोजन करुन नगर परिषद नगराध्यक्ष सौ. पद्मा गणेश रजपूत यांच्या हस्ते अखलाक कोतवाल व त्यांच्या पत्नी सौ. वहिदा कोतवाल यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी माजी नगराध्यक्ष दिनेश भट, जव्हार नगर परिषद विरोधी गटनेते दिपक कांगणे,नगरसेवक स्वप्निल औसरकर,वैभव अभ्यंकर,रहिम लुलानिया तसेच, सर्व सदस्य व कर्मचारीवृंद उपस्थित होते.
जव्हार प्रतिनिधी
भरत गवारी(पालघर)
मोबा.नं*8408805860.