मातोश्रींच्या वाढदिवशी जिजाऊ सामाजिक संस्थेचा सामाजिक उपक्रम

जव्हार आगारातील परिवहन संपकऱ्यांना धान्य वाटप

पालघर : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या मातोश्री सौ.भावनादेवी भगवान सांबरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन जव्हारच्या महालक्ष्मी मंदिर परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरात ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.ह्या रक्तदान शिबिराचे उदघाटन भावनाताईंनी केक कापुन केले.

तसेच जव्हार आगारातील २२६ परिवहन संपकऱ्यांना महिना भर पुरेल इतके अन्न -धान्य यावेळी वाटप करण्यात आले. मागील ८६ दिवसांपासुन परिवहन कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपावर असल्याने घर चालावायचे कसे?अशा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला होता.ह्या धान्यामुळे परिवहन कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.याप्रसंगी सौ.भावनादेवी भगवान सांबरे,भगवान महादेव सांबरे, निलेश(पिंका)पडवळे नगराध्यक्ष विक्रमगड नगरपंचायत,हबीब शेख जि.प.सदस्य पालघर,सौ.पद्मा गणेश रजपूत नगराध्यक्षा जव्हार नगरपरिषद,रविंद्र खुताडे व जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

जव्हार प्रतिनिधी
भरत गवारी(पालघर)
मोबा.नं*8408805860

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *