पालघर : जव्हार शहरातील ग्रामीण भागातील तरुणींना एक महिन्याचे मेकअप अर्टिस्ट प्रशिक्षण जव्हार येथे देण्यात आले. हे प्रशिक्षण दिपाली केबल नेटवर्कचे मालक सुनिल जाधव यांच्या कन्या प्रशिक्षक प्रियंका जाधव यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण तरुणींना देण्यात आले. प्रियंका जाधव ह्या नाशिक येथे ब्युटीशियनचे काम करीत असतात.परंतु मागील महिन्यात कोरोना कालावधीत लग्नसराईचा मुहूर्त नसल्याने त्या जव्हारला आल्या होत्या.ह्या कालावधीत ग्रामीण भागातील तरुणींना हि आपण मेकअप अर्टिस्ट चे बेसिक ज्ञान देऊन मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने तरुणींना महिना भर मेकअपचे प्रशिक्षण दिले.


महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीत नववधू चा मेकअप कसा करावा,साजशृंगार, केस रचना, वेशभूषा,पेहराव,फेसलुक ,नेलपाँलिस यासारखे बारकावे समजावून सांगुन तरुणींना प्रशिक्षण दिले.या प्रशिक्षणाचा ६ तरुणींनी लाभ घेतला.त्यात जव्हारच्या ४ व ग्रामीण भागातील २ तरुणींनी लाभ घेतला. ह्या प्रशिक्षणात जव्हारच्या मेघाली वाघमारे, कल्याणी राऊत, हिना शेख, दर्शना वनमाळी तर ग्रामीण भागातील नेहा घेगड कोरतड,अर्चना दांगटे जामसर सौंदर्या पार्लर यांनी हे प्रशिक्षण घेतले.ह्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपञ देण्यात आली. जव्हारच्या रेड साँईल रिसाँर्ट येथे शुक्रवारी प्रशिक्षणार्थींना सामाजिक कार्यकर्ते मनोज कामडी व पञकार भरत गवारी यांच्या हस्ते प्रमाणपञांचे वाटप नुकतेच करण्यात आले.याप्रसंगी प्रशिक्षणार्थी तरुणी,प्रशिक्षक प्रियंका जाधव , तिचा भाऊ,आई-वडिल सपत्निक सुनिल जाधव आदि.मान्यवर यावेळी उपस्थित होते
जव्हार प्रतिनिधी
भरत गवारी(पालघर)
मोबा.नं*8408805860.