पालघर : जव्हार नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ.पद्मा गणेश रजपूत यांचा नगराध्यक्ष पदांचा तात्पुरता १७ दिवसांचा प्रभारी कालावधी संपल्याने पुन्हा जव्हार नगर परिषद नगराध्यक्ष पदावर चंद्रकांत पुरुषोत्तम पटेल यांची वर्णी लागली आहे. नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल यांनी आपल्या पदाचा पदभार मंगळवारी १५ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११ च्या सुमारास पुन्हा स्विकारला तर सौ.पद्मा गणेश रजपूत यांनी उप नगराध्यक्ष पदाची जबाबदारी ताब्यात घेतली आहे.यावेळी शिवसेना पक्षाचे स्थानिक जेष्ठ नेते प्रामुख्याने उपस्थित होते.

नगराध्यक्ष चद्रकांत पटेल यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी २१ जानेवारी २०२२ ते ७ फेब्रुवारी २०२२ पर्यंत रजा घेतली होती.या कालावधीत नगराध्यक्ष पदाचा प्रभारी पदभार पद्दमा गणेश रजपूत यांनी स्विकारला होता. ह्या कालावधीत पद्दमा रजपूत यांनी जव्हार नगर परिषदेच्या वार्डामधून विकास कामांच्या मंजुरीवर जोर देत गटारी, रस्त्यांची विविध कामे मंजूर करुन घेतली आहेत.त्यामुळे विकास कामांना वेग आला होता.


निलेश सांबरेच्या हस्ते विकास कामांच्या फलकांचे उदघाटन सौ.पद्दमा गणेश रजपूत यांनी नगराध्यक्ष पदाचा प्रभारी पदभार स्विकारल्या नंतर शहरातील वार्डातील विकास कामांच्या राहिलेल्या मंजुरीला धडाका लावला होता.त्यामुळे जव्हारवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.ह्या विकास कामांच्या नामफलकांचे उदघाटन जिजाऊचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते म्हणाले कि,ठेकेदारांनी हि कामे प्रमाणिकपणे करा.अशा इशारा त्यांनी दिला होता. परंतु अद्याप हि ह्या विकास कामांच्या कामाला मुहूर्त मिळालेला दिसत नाही.त्यामुळे हि कामे प्रत्यक्ष कधी सुरु होणार? अशा प्रश्न सामान्य जनतेला पडल्याशिवाय राहत नाही.
भावी जव्हार नगर परिषद निवडणूकीत जिजाऊ व शिवसेना युतीचे संकेत
जव्हार नगरपरिषदेतील जिजाऊच्या छुप्या राजकीय खेळीने पद्दमा रजपूत यांना नगराध्यक्ष पद काही कालावधीसाठी मिळाले होते.त्यावेळी सुध्दा जिजाऊ व शिवसेनेच्या स्थानिक दिग्गज नेत्यांची गट्टी पाहायला मिळाली. हिच साथ नेत्यांची विकासकामांच्या नामफलकांच्या उदघाटनावेळी हजेरी लावताना पाहायला मिळाली. त्यामुळे जव्हार नगरपरिषदेच्या येऊ घातलेल्या भावी निवडणुकीत जिजाऊ व शिवसेना युती करुन निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारांची फिल्डिंग लावु शकतात.यात तीळ मात्र शंका नाही.
नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल व शिवसैनिकांमध्ये,हास्य फुलले
नगराध्यक्ष चंद्रकांत पटेलांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा नगराध्यक्ष पद हाती घेतल्यावर शिवसैनिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर शिवसेनेत जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे शुभेच्छा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.


नगराध्यक्ष पदभार स्विकारता शिवसेनेने प्रसार माध्यमांना ठेवले बेसावध,सोशल मिडियात हि सामसूम नगराध्यक्ष चंद्रकांत पटेलांचा रजेचा कालावधी उलटून आठवडा झाल्यानंतर गप्पचीप शिवसेना पक्षाकडून हळुच नगराध्यक्ष चंद्रकांत पटेलांना खुर्चीत बसवले आहे.याची साधी भणक हि प्रसारमाध्यमांना लागु दिलेली नाही.हे सर्व नियमानुसार होताना हि गुप्तता का पाळली? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आज उधाण आणते आहे. याशिवाय चंद्रकांत पटेलांना शिवसेना नेत्यांकडून शुभेच्छा देणारे फोटो हि कुठेच सोशल मिडियात व्हायरल झाले नाहीत.त्यामुळे शिवसैनिकांत नाराजी आहे कि, काय? अशा हि प्रश्न उपस्थित राहिला आहे. याउलट आधी पाहिले तर पद्दमा रजपूत यांना नगराध्यक्ष पद मिळाल्यानंतर त्यांच्यावर सोशल मिडियात व बँनरबाजीतुन शुभेच्छांचा वर्षाव झाला होता.हे चिञ नगराध्यक्ष चंद्रकांत पटेलांच्या बाबतीत शिवसेना पक्षात पाहायला मिळाले नाही.
शिवजयंती कार्यक्रमांचा नारळ नगराध्यक्ष चंद्रकांत पटेलांच्या हस्ते फुटणार
गेल्या दोन वर्षात कोरोनाने शिवजयंती कार्यक्रमांवर संक्रात आणली होती.त्यामुळे शिवसैनिकांच्या जल्लोषावर विरजण पडले होते.परंतु यंदा शिवजयंतीचा उत्साह दांडगा असल्याने जव्हार शहरात कार्यक्रमांची रेलचेल असुन कार्यक्रमांसाठी नगराध्यक्षांची उपस्थिती असणार आहे.

वैयक्तिक घेतलेल्या प्रदीर्घ रजेचा कालावधी संपल्यानंतर मंगळवारी नगराध्यक्ष चंद्रकांत परुषोत्तम पटेलांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारला.त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिवसेनेचे स्थानिक दिग्गज नेते माजी नगराध्यक्ष दिनेश भट, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रफुल पवार, शिवसेना तालुकाप्रमुख श्रावण खरपडे, शहरप्रमुख परेश पटेल, माजी नगरसेवक विजय घोलप, चिञांगण घोलप,गणेश रजपूत, सौ.पद्दमा रजपूत, संकेत माळगावी आदी शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
जव्हार प्रतिनिधी
भरत गवारी(पालघर)
मोबा.नं*8408805860.