पालघर नगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित विकास कामे लवकरात लवकर व्हावीत म्हणून, खासदार श्री राजेंद्र गावित साहेब ह्यांनी पालघर नगरपालिकेचे नगरसेवक , संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती . त्यावेळेस गायब झालेल्या नाले यांबद्दल व रस्त्याबद्दल नगरसेवकांनी तक्रार केली असता टाऊन प्लॅनिंग चे अधिकारी , टी . एल आर चे अधिकारी , स्थानिक नगरसेवक प्रशासकीय अधिकारी, यांच्यासोबत खासदार राजेंद्र गावित संयुक्त दौरा करणार आहेत असे त्याने बैठकीदरम्यान सांगितले

या बैठकीत विकासकामांबद्दल चर्चा झाली. फॉरेस्ट जागेवरील अतिक्रमण , भोगोला पाडा व मोरवाळी पाडा , येथील स्मशानभूमी , नक्षत्र गार्डन , नगर पालिकेच्या ताब्यात देणेबाबत , प्रदूषण करणार्‍या कंपनीवर कारवाई करण्याबाबत , रस्ते सीमांकन , गावठाण भूमापन , वर्ग-२ जागेवरील अतिक्रमण – गुरु चरणा वरील अतिक्रमण यावर कारवाई करण्याचे ठरले.

नगर पालिकेच्या ताब्यात मिळालेले तलाव मोजण्यासाठी टी एल आर ने २ मार्च ३ मार्च ४ मार्च ७ मार्च अशा तारखा दिल्या. टी एल आर ने जुने नकाशे उपलब्ध करून द्यावे असे ठरले . विद्युत वितरण च्या रखडलेल्या कामे लवकरात लवकर करून पूर्वेकडील गंजलेले पोल व देविषा रोड येथील रस्त्याला अडथळा येणारे ट्रान्सफॉर्मर बदलण्या बाबत सकारात्मक चर्चा झाली. ट्राफिक बाबत सकारात्मक चर्चा होऊन , पोलीसानी ट्राफिक बाबत प्लान द्यावा. ट्राफिक साठी वेगळी यंत्रणा वाहतूक शाखा सुरू करावी त्यासाठी राजेंद्र गावित पाठपुरावा करणार आहेत नगरपालिकेचे अनेक टी एस हे एमजीपी कडे सहा महिने पडून असतात मंजुरी त्यांना आठवड्यात मंजुरी द्यावी , असे खासदार साहेबांनी सुचविले. नगरपालिकेत असलेल्या अपूर्ण कर्मचारी वर्गाबाबत चर्चा झाली असता एप्रिल महिन्यात प्रधानसचिवान बरोबर बैठक घेऊन सोडवला जाईल असे खासदार गावित म्हणाले. या बैठकीसाठी शिवसेना पालघर लोकसभा समन्वयक केदार काळे , नगराध्यक्ष डॉक्टर सौ उज्ज्वला काळे ,शिवसेना गटनेते कैलास म्हात्रे ,आरोग्य सभापती अक्षय संखे , महिला व बालकल्याण सभापती प्रियांका म्हात्रे , बांधकाम सभापती दिनेश घरट , नगरसेविका अनुजा तरे, नगरसेविका राधा मानकामे पा माले ,. नगरसेविका चेतना गायकवाड ,नगरसेविका सेविका शेरबानो मेमन ,नगरसेवक अमोल पाटील नगरसेवक रवींद्र म्हात्रे नगरसेवक राजेंद्र पाटील नगरसेवक नगरसेवक सुभाष पाटील नगरसेवक चंद्रशेखर वडे नगरसेवक पांडुरंग मोरे नगरसेविका चेतना गायकवाड नगरसेवक तुषार भानुषाली नगरसेवक दिनेश बाबर तहसीलदार सुनील शिंदे मुख्याधिकारी स्वाती कुलकर्णी फॉरेस्ट ऑफिसर गजानन सानप फॉरेस्ट ऑफिसर तुषार काळभोर एपीआय सुधीर उबाळे पी एल आर सुभाष जाधव प्रदूषण अधिकारी व अनेक खात्याचे अधिकारी उपस्थित होते

  


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *