उस्मानाबाद : तालुक्यातील येडशी येथील पै.सुनिल भैय्या शेळके यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य निकाली कुस्ती मैदानी चे आयोजन शिवसेना उपजिल्हा प्रमुख विजयकुमार सस्ते यांच्या मार्गदर्शना खाली जिल्हा परीषद शाळेत करण्यात आले होते या स्पर्धाच्या उदघाटना प्रसंगी व बक्षीस वितरणाला शिवसेना उपजिल्हा विजय कुमार सस्ते युवा नेते आतिष पाटील पोलिस निरीक्षक बुदवंत साहेब मा.सरपंच हेमंत बापु सस्ते सरपंच गोपाळ नागटिळक मा.ग्रा.सदस्य संजय पाटील मा.उपसरपंच पिमन दादा सस्ते बाळासाहेब पवार अर्जुन शेळके विभाग प्रमुख विनोद पवार बाळासाहेब मेटे महेश नलावडे आशोक दादा पवार जयंत भोसले दतात्रय देशमुख पोलिस दिपक पाटील अमर पवार सुनिल शेळके भिमा शिदें पंकज शिदें आशोक देशमुख आमोल पवार पाडुरंग खोबरे आमोल देशमुख विलास काळे परमेश्वर पवार हनुमंत गुरव गणेश निचळ आबा शेळके याच्यां सह ग्रामस्थांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला

या स्पर्धेसाठी कोल्हापूर सोलापूर उस्मानाबाद लातुर बार्शी कुर्डवाडी तुळजापूर सह खेड्यातील पैलवानी भाग घेत आखाड्यात रंगत उभा केली तर प्रेक्षकांनी पैलवानांना बक्षीसे वाटप करुन पैलवानांना प्रोत्साहन दिले होते या स्पर्धेत पोस्टर वरती चार कुस्त्या नेमण्यात आल्या होत्या त्यातील कोल्हापूर गंगा वेस तालीमचा संग्राम काकडे यांना विजय कुमार सस्ते यांच्या वतिने 52हजार रुपये रोख व चांदीचा गद्दा देण्यात आला तसेच कुर्डूवाडीचा मनोज माने यांना संयोजकाच्या वतिने 42 हजार रूपये रोख व चांदी गद्दा देण्यात आला तर येडशीच्या राहुल शेळके यांना संजय पाटील याच्या कडुन 32 हजार रोख व चांदीचा गद्दा देण्यात आला तर चौथा खडुसचा परमेश्वर गाडे यांना ग्रा.प सदस्य अमर पवार याच्यां कडुन 21 हजार रोख देण्यात आले. यावेळी सुत्रसंचालन देवकते यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय कुमार सस्ते मित्र मंडळ व सुनिल शेळके मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले
प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी मो.9922764189