लातूर : जळकोट नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया दि.२फेब्रुवारी पासून सुरू झालीआहे.दि.३ फेब्रुवारी हा नगराध्यक्ष पदासाठी नामांकन भरण्याची तारीख होती.या दिवसी राष्ट्रवादी कडून नगराध्यक्ष पदासाठी प्रभावती चंद्रकांत कांबळे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार आहे.हे आता निश्चित झाले आहे.दि.९फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

नगरपंचायत नगराध्यक्ष निवडीसाठी कांग्रेस, राष्ट्रवादी, तसेच शिवसेना नगरसेविकांची बैठक कांग्रेसचे जेष्ठ नेते मन्मथ किडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे यांचीही उपस्थिती होती.तसेच मिनाक्षी ओमकार धुळशेटे,वर्षा सचिन सिध्देश्वरे, गोपाल कृष्ण गंगाधर गबाळे, अश्विनी महेश धुळशेटे, संगिता नागोराव धुळशेटे, सुमनबाई त्र्यंबक देशमुख, शिवलिंग धुळशेटे, विनायक वीरभद्र डांगे,बाबुमिया लाटवाले, संदीप दिगांबर डांगे, लक्ष्मीबाई मंगनाळे, संग्राम नामवाड या नगरसेविकांची उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेस कडून प्रभावती चंद्रकांत कांबळे व सुरेखा गवळे या दोन नगरसेवक नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होत्या परंतु नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून सर्वानुमते प्रभाग क्रमांक १६ मधुन विजयी झालेल्या प्रभावती चंद्रकांत कांबळे यांची निवड करण्यात आली.यामुळे यांचा एकमेव अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी भारत राठोड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.कांग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी मन्मथ किडे यांची बिनविरोध निवड झाली.नगराअध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यामुळे उपनगराध्यक्ष पदी मन्मथ किडे यांची निवड निश्चित मानली जात आहे.दि.९ फेब्रुवारी रोजी नगराध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर लगेच उपनगराध्यक्ष पदाची निवड करण्यात येणार आहे.

लक्ष्मीकांत मोरे
उदगीर, जळकोट प्रतिनिधी लातुर
एन.टिव्ही.न्युज मराठी. मो.९१३०५५३९९७

       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *