लातुर : लॉटरी म्हणले की आनंदी आनंद होतो काही व्यक्ती तर जिवनभर लॉटरी तिकीट काढत असतात मात्र त्यांना कधीच लागलेली नसते.मानसाला जिवनात पैसे हवे असतात पण कधी कसा व्यक्ती फसला जाईल हेही सांगता येत नाही.ब-याच वेळा आपण कितीही हुशार विद्वान असलो तरीही बोलण्यावर व लॉटरी म्हटले की काही जणांची फसवणूक होते.तर खालील बातमी वाचा व फसवणुकीपासून सावधान रहा कदाचित तुम्हाला पण फोन आला तर लॉटरीच्या विचारात फसवणूक करुन घेऊ नका.


उदगीर तालुक्यातील लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा हंडरगुळी येथील कार्यरत लिपीक गजानन संग्राम पंदरगे वय ३८ यांना अनोळखी व्यक्तींनी १ लाख ४६ हजार २०० रुपये आँनलाईन फसवणूक केल्याची फिर्याद दाखल केली आहे.वाढवणा (बु) पोलिस ठाण्यात गु.र.नं.१२/२२ कलम ४२० भादवी ६६ ड आयटी अॅक्ट नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत. मिळालेली माहिती अशी की पंदरगे यांना +९२ ३०५७६७७३८८ या नंबर वरुन कॉल आला की तुम्हाला २५ लाखाची लॉटरी लागली आहे. एका अनोळखी व्यक्तींनी मी राणा प्रताप सिंग बोलतोय, व्हाटऑप वर जाहिरात टाकली त्यावर सर्व माहिती दिली होती व लाटरी नं.व एक व्हाटऑप नंबर दिला व तो नंबर सेव्ह करुन त्या वरुन नेटकॉल करण्यास सांगण्यात आले.नंतर काही व्हिडिओ पाहण्यासाठी टाकण्यात आले


तुम्हाला २५ लाखाची लॉटरी लागली आहे.कोन बनेगा करोडपती मधुन बोलतोय तर तसेच तुम्ही ऐवढे पैसे भरा ही फीस, ही टॅक्स, सांगुन पाच दिवसांमध्ये पुर्णपणे पैसे या व्यक्तींनी दिलेल्या अकाऊंट नंबरवर १) रब साहेब यांच्या मोबाईल नंबरवर गुगलपे ३०००/-२)पवन राज दिलेल्या बॅंक अकाऊंट नंबरवर ५०००/- रुपये ३) अतुल कुमार दिलेल्या बॅंक अकाऊंट नंबरवर ५१,०००/- रुपये ४)तुलसी, दिलेल्या बॅंक अकाऊंट नंबरवर ५२,२००/-रुपये ५)मोहन ठक्कर दिलेल्या बॅंक अकाऊंट नंबरवर २०,०००/- रुपये ६) संदीप कुमार दिलेल्या बॅंक अकाऊंट नंबरवर १५,०००/-. रुपये असे एकूण १लाख ४६ हजार २००रुपये पाटवले ते वेळोवळी व्हिडिओ पाहण्यासाठी टाकण्यात आले काही पावत्या बनावट पाटवल्या की खरोखरच पुढील व्यक्तीचा विश्वास वाटावा या प्रकारे या व्यक्तिची फसवणूक केली नंतर लक्षात आले की आपली फसवणूक झाल्याचे, तोपर्यंत वरील प्रमाणे सर्व पैसे पाठवले होते. तरी सर्व नागरिकांनी खबरदारी घ्यावी भुल, थाप, बोलण्यावर विश्वास ठेऊ नका खरं का खोटं तपासणी करा मित्र मडळी मध्ये चर्चा करा तरी या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
लक्ष्मीकांत मोरे
उदगीर, जळकोट प्रतिनिधी लातुर