वाशिम : बालकांची वाढ तसेच विकास कसा साधायचा यासाठी प्रशासकीय स्तरावर अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण घेण्याचे ठरवले. या अनूषंगाने वाशिम येथे “आरंभ प्रशिक्षणास” सुरुवात झाली. 0 ते 3 वयोगटातील बालकांच्या वाढ व विकास होण्यासाठी मास्टर ट्रेनर पर्यवेक्षिका यांनी सेविकांचे प्रशिक्षण घेण्यात आले.

जेणेकरून सेविका घरोघरी जाऊन 0ते 3 वयोगटातील बालकांच्या वाढ व विकासाबाबत ची माहिती पालकांना देऊन बालकाच्या शरीराचा व बुद्धीचा तसेच शारीरिक व मानसिक विकास घडून येण्यास हातभार लावतील. कार्यक्रमाचे उद्घाटन बालविकास प्रकल्प अधिकारी कु. प्रियंका गवळी यांनी केले तसेच प्रमुख उपस्थिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री जोल्हे यांची होती, पर्यवेक्षिका सौ धोटे व वानखडे उपस्थित होत्या.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206