उमरगा उपविभागीय पोलीस पथकाची कारवाई
उस्मानाबाद (सचिन बिद्री) : उमरगा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पो का.माधव समर्थ बोईनवाड,पो.स्टे.मुरुम येथे सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादि नुसार उपविभागीय पोलीस अधीकारी आर.एस बरकते यांच्या तोंडी आदेशानुसार उपविभागहद्दी मध्ये अवैध धंद्याची माहीती घेवुन कारवाई करण्याबाबत, पोना. गरड, पोलीस मिञ अशोक जाधवर असे खाजगी वाहनाने माहीती काढत असताना पोस्टे मुरुम हद्दीत प्राँपर मुरुम येथे गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त माहीती आधारे, मौजे कोथळी येथे चोरीची वाळु अवैध रित्या विनापासपरवाना येत असल्याची माहीती श्री माधव बोईनवाड यांना मिळाली,त्याआधारे मौजे कोथळी गावाच्या दिशेने जात असलेचे संशयीत वाहन भारतबेन कंपनिचे हायवा टिप्पर पिवळे व निळसर रंगाचे क्र. के ए 53सी-2112 आढळून आले. दि 08/02/2022 रोजी 23:45 वाजता संबंधित वाहन थांबवुन पाहणी केली असता सदर वाहनात वाळु असल्याचे दिसले तर वाहनचालक हा जागीच वाहन सोडुन पळुन गेला, वाहनातील वाळुबाबत
टिप्परमध्ये असलेल्या इतर एका इसम याचेकडे अधीक चौकशी केली असता त्यांच्याकडे अधीकृत पावती
मिळुन आली नाही व त्यांनी उडवाउडवा ची उत्तरे दिली.दरम्यान मुरूम पोलीस स्टेशन चे पोहेका महानुरे, सुवसे यांना फोन करुन बोलावून घेतले व वाळू वाहतूक करणारे,1) महमद हानिफ
अबासअली वय 39 वर्ष रा. रिंगरोड 3 क्लास मिझबा नगर गुलबर्गा बसवण्णापुर कर्नाटक 2) वाहन चालक (फरार) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.यामध्ये 5 ब्रास वाळु ज्याचे मूल्य 40000/- रुपये व भारतबेंज कंपनिचे पिवळ्या निळसर रंगाचे टिप्पर 12,00,000/- रु,असे एकूण 12,40,000 रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.वाहन चालक आणि त्याच्या सहकार्या विरुध्द कलम 379,34 अंतर्गत मुरून ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.