लातूर : उदगीर येथील साहित्यिक शंकर बोईनवाड यांना संत गाडगे महाराज विचारमंच महाराष्ट्र राज्य ओतूर ता.जुन्नर जि.पुणेच्या वतीने साहित्यातील योगदानाबद्दल दिला जाणारा राज्यस्तरीय साहित्य सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे.


शंकर बोईनवाड हे गेल्या दोन ते अडीच दशकापासून कथा, कविता ,बालसाहित्यात लिखाण करीत असतात.त्यांचा “चिव चिव चिमणी ” हा पहिला बालकविता संग्रह औरंगाबादच्या साकेत प्रकाशनानी १९९८ मध्ये प्रकाशित केला.त्यांनतर तब्बल २२ वर्षांनी “कोल्हेवाडीचा बाजार ” हा दुसरा बालकविता संग्रह गुरुमाऊली प्रकाशन उदगीर च्या वतीने प्रकाशित करण्यात आला. तर ” आदर्श नगरीचा राजू ” ही किशोर कादंबरी व ” क्रांतीकारकांनो “हा कविता संग्रह प्रकाशनासाठी सिद्ध आहेत. नांदेड आकाशवाणीवरून त्यांचे अनेक वेळा काव्यवाचन प्रसारित झाले आहे. राज्यस्तरीय काव्यलेखनाचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.अलीकडेच प्रकाशित झालेल्या “कोल्हेवाडीचा बाजार “या बालकविता संग्रहास रोहिपिंपळगाव जि.नांदेड येथील यशवंतराव चव्हाण विचारमंचचा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, हिंगोलीचा संत नामदेव बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यांच्या साहित्यातील एकूणच कार्याची दखल घेऊन संत गाडगे महाराज विचारमंच ओतूर,पुणे यांनी हा राज्यस्तरीय साहित्य सेवा पुरस्कार जाहीर केला असून पुढील महिन्यात ओतूर,ता.जुन्नर जि.पुणे येथे एका विशेष कार्यक्रमात तो त्यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती विचारमंचाचे संस्थापक कार्याध्यक्ष श्री.रणजित नारायण पवार यांनी निवडपत्राद्वारे कळविले आहे. बोईनवाड यांच्या हया यशाबद्दल त्यांचे साहित्यिक, साहित्य रसिक,पत्रकार व मित्रमंडळीकडून अभिनंदन होत आहे.

लक्ष्मीकांत मोरे
एन.टिव्ही.न्युज मराठी
उदगीर, जळकोट प्रतिनिधी लातुर
दि.१३/०२/२०२२
मो.९१३०५५३९९७
९०२२४९३४९१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *