लातूर : ९५ व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन संदर्भात शहरातील डॉक्टर व कमिस्ट पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

अध्यक्षस्थानी संमेलन कार्याध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर मंचावर उपाध्यक्ष तथा मराठवाडा साहित्य परिषद उदगीरचे अध्यक्ष रामचंद्र तिरूके , सचिव प्रा.मनोहर पटवारी, सहसचिव डॉ.श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे,सदस्य डॉ.रामप्रसाद लखोटिया,प्रा.आडेप्पा अंजुरे, प्राचार्य आर.आर.तांबोळी, उपप्राचार्य आर.के.मस्के, धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य दत्ता पाटील, उदगीर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.गोविंद सोनकांबळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.शशीकांत देशपांडे, होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत कोठारे, उदगीर डॉक्टर वुमन फोरमचे अध्यक्ष डॉ.ज्योती मध्वरे,निमाचे अध्यक्ष डॉ.राजकुमार घोणसीकर, केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सत्यवान बोरळकर,प्रकाश साखरे,यांची उपस्थिती होती प्रस्ताविकात डॉ.लखोटिया यांनी संमेलन कार्यात डॉक्टर व केमिस्ट संघटना काळजीपूर्वक भाग घेईल,अशी अपेक्षा व्यक्त केली.प्रा.पटवारी यांनी पदाधिकाऱ्यांचे स्वागत करुन सक्रिय सहभाग नोंदवावा असे मत व्यक्त केले.तिरुके यांनी कोरोना काळात डॉक्टर व केमिस्ट बंधुचां उल्लेखनिय सेवेचा गौरव करुन संमेलन काळात सुध्दा आपण असेच कार्य करावे अशा व्यक्त केली.केमिस्ट व डॉक्टरांनी आपला वेळ क्षमता वापरुन संमेलन लक्षणीय करण्याचा मानस व्यक्त केला.समारोप प्रसंगी बस्वराज पाटील नागराळकर म्हणाले की मानवाच्या बुध्दी विकासासाठी साहित्याला महत्व आहे.संमेलनाच्या निमित्ताने सुसंस्कृत व जागृत शहर म्हणून उदगीरची जगात ओळख होणार असुन याकामी आपला सहभाग व मार्गदर्शन अपेक्षीत आहे.सुत्रसंचालन प्रा.डॉ.राहुल आलापुरे तर आभार प्रा.डॉ.विनय नागपुर्णे यांनी मानले.
लक्ष्मीकांत मोरे
एन.टिव्ही.न्युज मराठी
उदगीर जळकोट प्रतिनिधी लातुर
संपर्क:-९१३०५५३९९७
९०२२४९३४९१