लातूर : बंजारा समाजाचे कुलदैवत श्री संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची जयंती विविध संघटना व पोलिस प्रशासनाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मंगळवारी साजरी करण्यात आली.

संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला उदगीर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोरख दिवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलेयावेळी भ्रष्टाचार निर्मूलन अभियानाचे प्रमुख संजयकुमार कांबळे, पोलिस हवालदार शिवाजी जाधव, सोमनाथपुर ग्रामपंचायत सदस्य संजय राठोड,माजी मुख्याध्यापक किशन चव्हाण, नितीन ऐकुर्केकर, दैनिक बालाघाटचे पत्रकार दत्ता पाटील, बापुसाहेब कांबळे,राजेश्वर भाटे, अमित महाडे, राजकुमार आडे,बबलु राठोड, विनायक पवार, भ्रष्टाचार निर्मूलन अभियानाच्या आघाडी महिला प्रमुख ज्योती संजयकुमार कांबळे,शिवकर्णाताई अंधारे, सुरेखा विदेश पाटील,अनुसयाबाई दिगंबर पवार, मिराताई शिवाजी राठोड, जयश्री संजय राठोड,देऊबाई पवार,आदीसह विविध संघटनेचे पदाधिकारी महिला व बंजारा समाजातील महिला उपस्थित होत्या
लक्ष्मीकांत मोरे
एन.टिव्ही.न्युज मराठी
उदगीर जळकोट प्रतिनिधी लातुर