लातूर : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथे पत्रकारांची बैठक घेण्यात आली त्यावेळी हाळी हंडरगुळी पत्रकार संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष, यावेळी पत्रकारांच्या उपस्थित सर्वानुमते निवड करण्यात आली.दैनिक एकमत,एन.टीव्ही.न्युज मराठी व न्युज चॅनल पुरस्कार प्राप्त लक्ष्मीकांत मोरे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

अध्यक्षपदी लक्ष्मीकांत मोरे
सचिवपदी पप्पू पाटील

मुंबई येथे मोठ्या राहुल ग्रुपमध्ये सात वर्ष इंग्रजी माध्यमाच्या डि.एड.साठी प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले आज त्यांचे विद्यार्थी चांगल्याप्रकारे नामांकित शाळेमध्ये पदावर कार्यरत आहेत.पत्रकार म्हणून ते ब-याच दिवसांपासून काम करतात त्यांच्या लेखनात, विचारात, प्रभाव आहे. पत्रकार म्हणून चांगली भूमिका निभावतात त्यांच्या कार्याचे सर्वत्रच कौतुक होते, कौतुकास्पद काम असते. तसेच उपाध्यक्ष विश्वनाथ हांडे, सचिव पदी पप्पू पाटील,तसेच कार्याध्यक्ष फारुख शेख,सदस्य रोहीदास कलवले, विकास गायकवाड, धर्मेंद्र कांबळे भुपेद्र काळेगोरे, परमेश्वर माने,अशा निवडी करण्यात करण्यात आल्या त्यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *