(सचिन बिद्री:उमरगा)

उस्मानाबाद : संत सेवालाल महाराज यांची जयंती मंगळवारी ता.१५ रोजी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने वाहनफेरी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार, महाप्रसाद वाटप यासह अन्य धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

क्रांतीकारी संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समिती, सकल बंजारा समाजाच्या वतीने सकाळी दहा वाजता दुचाकी फेरी काढण्यात आली. शिवसेना युवा नेते किरण गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विक्रम किशन पवार,योगेश तपसाळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले आणि संत सेवालाल महाराज की जय, असा जयघोष करत फेरीला प्रारंभ झाला.जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अध्यक्ष विक्रम पवार,शंकर राठोड, जगन्नाथ चव्हाण,रमेश जाधव,ऍड दिनकर जाधव,प्रताप राठोड उपस्थित होते. दरम्यान हॉटेल बंजारा मागील बाजूस असलेल्या सेवालाल मंदिरात विधिवत होम पूजन करण्यात आले, विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. मान्यवरांनी सेवालाल महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकीत तरुणांनी उच्चशिक्षण घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर गोर बंजारा समाजातील विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी गुलाब राठोड, सुनील राठोड, श्रीराम राठोड, भास्कर जाधव, सचिन चव्हाण,मारुती राठोड,मोहन चव्हाण यासंह युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *