प्रतिनिधी:उमरगा

उस्मानाबाद : मराठवाड्यात कोरोनाने निधन झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला अद्याप कसलीच मदत भेटली नाही-सरपंच पावशेरे यांनी शिक्षक आमदारांना निवेदन देत त्वरित मदतीची मागणी केली

शिक्षक आमदार विक्रम काळे यांना सरपंच सुनिता पावशेरे यांनी विविध मागण्याचे निवेदन देत अडचणी मांडल्या.मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांना कलदेव निंबाळच्या सरपंच सुनिता पावशेरे यांच्यातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विद्यालयातील मुली व मुले, मागासवर्गीय,अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शासनाच्यावतीने विविध शिष्यवृत्ती,भत्ता दिला जातो तो अत्यंत तुटपुंजा असून सध्याच्या महागाईच्या काळात तो अत्यंत कमी आहे,संबंधित भत्ता/शिष्यवृत्ती वाढत्या महागाईच्या अनुषंगाने वाढऊन देण्यात यावा तसेच कोरोना काळात उमरगा तालुक्यांसह मराठवाड्यातील कांही शिक्षक कर्मचारी कोरोना संसर्गाने निधन झाले आहे.पण अद्याप शासनाच्या वतीने त्यांना मदत/अनुदान देण्यात आले नाही.त्यांना त्वरीत मदत अनुदान देण्यात यावे.अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
याप्रसंगी माने जी.एस.,चेअरमन तुकाराम बिराजदार,व्हाईस चेअरमन राजेंद्र घोटमाळे, सुधाकर कुलकर्णी, प्रभाकर बिराजदार, प्रा.रमाकांत पाटील, गोविंदराव डोणगावे, अॅड नंदकिशोर बिराजदार,मु.अ.प्रमोद तावशीकर, त्र्यंबक डोणगावे,पिंटू कुलकर्णी,स.शि.बालाजी मसलगे, सर्व शिक्षक,नाभिक संघटना तालुका अध्यक्ष मारुती सुरवसे, गहिनीनाथ बिराजदार, सुनिल बलसुरे,शंकर कुलकर्णी, प्रेमचंद नोगजा,अरविंद दळवे , विठ्ठल दासमे आणि देविदास पावशेरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *