येरंडा तलावातून पाणी जलशुध्दीकरण केंद्राचा सुध्दा समावेश
नागपुर : वाढती लोकसंख्या लक्षात घेता काटोल तालुक्यातील पारडसिंगा येथे नवीन पाणी पुरवठा योजनेची मोठया प्रमाणात आवश्यकता होती. येथील नागरीकांची मागणी लक्षात घेता या भागाचे आमदार अनिल देशमुख यांनी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. याचा पाठपुरावा करीत जल जिवन मिशन अंतर्गत काटोल तालुक्यातील पारडसिंगा ग्राम पंचायतीसाठी 9 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजुर करण्यात आली असुन निविदा प्रक्रीया सुरु करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी दिली आहे.
ही योजना मंजुर केल्याबदल राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राज्य मंत्री संजय बन्सोडे, सलील देशमुख यांचे ग्रामपंचायत व पारडसिंगा येथील नागरीकांनी आभार मानले आहे. लवकरच या योजनची निविदा प्रक्रीया सुरु करण्यात आली असून लवकरात लवकर कामास सुरुवात होणार असल्याची माहिती सुध्दा सलील देशमुख यांनी यावेळी दिली. या मंजुर 9 कोटी मध्ये जलशुध्दीकरण केंद्र, साडेतील लाख लिटरची क्षमतेची पाण्याची टाकी, वितरण व्यवस्थेसाठी पाईनलाईन, मोटर पंप व इतर गोष्टीचा समावेश आहे.
येरंडा येथील तलावातुन पाणी घेवून त्याचे शुध्दीकरण करुन नंतर ते वितरीत करण्यात येणार आहे. या भागाचा दौरा करीत असतांना तसेच स्थानीक पदाधीकाऱ्यांनी पारडसिंगा येथे नविन पाणी पुरवठा योजना मंजुर करण्याची मागणी या भागाचे आमदार व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. याचा प्रस्ताव तयार करुन तो मंजुरीसाठी मुंबई येथे मंत्रालयात पाठविण्यात आला होता. नागरीकांची मागणी लक्षात घेता ही योजना मंजुर होण्यासाठी सलील देशमुख यांनी पाणि पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व राज्यमंत्री संजय बन्सोडे यांच्याकडे बैठक घेतली होती हे विषेश. या योजनेमुळे पारडसिंगा येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल असे मत सुध्दा सलील देशमुख यांनी व्यक्त केले.