गडचिरोली : अहेरी तालूक्यातील आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर,राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्री आत्राम हलगेकर,राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम यांच्या उपस्थितीत अहेरी येथील युवक जावेद पीर मोहम्मद शेख,मोहम्मद अलीम मोहम्मद अजीम शेख,सलमान इस्माईल शेख,गफ्फुर करीम शेख,शानवाज मेहबूब शेख,शफीक शेख या युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचा दुपट्टा टाकून युवकांचे स्वागत केले.अहेरी विधानसभेत आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या तत्वावर आमचा विश्वास असून आम्हा युवकांचा विश्वास असून पक्ष बळकटीसाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे प्रवेशीत युवकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *