गडचिरोली : आष्टी – ईल्लुर जिल्हा परिषद क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार यांना राज्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात प्रगतीसाठी केलेल्या कार्याबद्दल तसेच कोरोनाकाळात केलेल्या भरीव जनसेवेबद्दल संस्थेमार्फत देण्यात येणारा राज्यकर्ता पुरस्कार 2021-22 सहयाद्री उद्योग समूह हा महाराष्ट्रातील नामांकित उद्योग समूहापैको अग्रगण्य उदयोग समूह असून हा समूह मीडिया, बँकिंग व सेवा क्षेत्रात गेली १० वर्षापासून कार्यरत आहे. समूहाचा भाग असलेल्या न्यूजलाईन मिडिया प्रा. लि. मार्फत प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रात नेत्रदीक कामगिरी करणाऱ्या संस्था व व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचं काम करण्यासाठी विविध पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात येते.

संस्थेच्या अभ्यासानुसार जिल्हा परिषद सदस्य रुपाली संजयराव पंदिलवार यांनी नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेतलेला आहे महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय वाटचालीत अमूल्य योगदान आहे व हाच वारसा समर्थपणे पुढे चालवत असताना पुढील जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावत आहेत व याच मुळे रुपाली पंदिलवार जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली यांचा आदर व अभिमान आहे.होऊ घातलेल्या निवडणुकीत व आपल्या भावी वाटचालीत व्यक्तिमत्वाला एक वेगळे महत्व आले. कारकिर्दीला एक नवीन आयाम देण्याकरिता राज्यकर्ता पुरस्कार 2021-22 आयोजित करुन भावी कारकीर्दीस व निवडणुकीसाठी हा पुरस्कार अतिशय महत्वाचा ठरणार आहे. सदर पुरस्काराचे वितरण हे महाराष्ट्रातील नामवंत खासदार संजय राऊत , महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, जलसंपदा मंत्री , जयंत पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे ( पालवे) या मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे


भास्कर फरकडे
एन टिव्ही न्यूज मराठी
चामोर्शी गडचिरोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *