वाशिम : पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथे दिनांक ०२/०३/२०२२ रोजी फिर्यादी नामे रूपाली केशवराव सोळंके पुरवठा निरीक्षण अधिकारी तहसिल कार्यालय मंगरूळपीर यांनी फिर्याद दिली की, गवळीपूरा मंगरूळपीर येथे दिनांक २८/०२/२०२२ रोजी दुपारी ०३.३० वा. अवैध धान्य साठा असल्याची माहीती मिळाली. त्यानूसार गवळीपूरा मंगरूळपीर येथे उपस्थीत होवून धान्य साठयाची पाहणी केली असता सलीम घसीटा नंदावाले.यांचे मालकीच्या जागेवर एकून गहू २८ कटटे तांदूळ ५८ कटटे आढळून आले.

तसेच त्यांच्या घरासमोर उभे असलेल्या अॅपे वाहन क्र. एम.एच. ३७ जी ३१२ मध्ये गहू ४ कटटे व तांदूळ ८ कटटे एम.एच १७ व्ही ९९०२ मध्ये गहू २ कटटे व तांदूळ २ कटटे असे धान्य मिळून आले. सदर धान्याबाबत धान्याचे मालक श्री.निजाम सलीम नंदावाले रा. गवळीपूरा मंगरूळपीर यांचे जवळ कोणतीही पावती आढळून आली नाही. सदर धान्य सलीम घसीटा नंदावाले यांचे मालकीचे जागेवर असून धान्य खरेदी विक्री निजाम सलीम नंदावाले हे करतात. श्री निजाम सलीम नंदावाले यांचे बयान घेतले असता त्यांचे बयानवरून ते धान्याचे व्यापारी असल्यामूळे गहू व तांदूळ खरेदी करतात अॅपे या वाहनाद्वारे लोक धान्य या ठीकाणी आणतात व ते धान्य खरेदी केली जाते. सदर धान्याबाबत कोणतीही पावती नसल्याने व वाहन चालकाचे बयान वरून तसेच धान्य संशयास्पद वाटत असल्यामूळे धान्य व वाहनांचा पंचनामा करून धान्य व वाहन जप्त केले. तसेच धान्य खराब होवू नये म्हणून शासकीय धान्य गोदाम येथे जमा करण्यात आले. सदर बाबत पोलीस स्टेशन मंगरूळपीर ला अपराध क्र. १७९/२०२२ कलम ३,७ अत्यावश्यक वस्तू अधिनियमचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हयामध्ये १. सलीम घसीटा नंदावाले,२. निजाम सलीम नंदावाले, ३. वाहन चालक नामे आरीफ जमील मोहनावाले,४. एम एच.३७ जि.३१२ चा चालक मालक, ५.वाहन क्र.एमएच १७ व्ही ९९०२ चे चालक ईमराण सलीम कलरवाले, हे गुन्हयातील आरोपी असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. मंगरूळपीरचे पोलीस उप निरीक्षक अजय चव्हाण हे करीत आहेत.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206