वाशिम:-मंगरुळपीर शहरालगतच्या स्मशानभुमीलगतच्या एका खाजगी गोडावुनवर मंगरुळपीर महसुल विभाग आणी पोलीसांनी छापा टाकुन राशन तस्करीप्रकरणी खाजगी गोडावून सिल केले आहे.सदर गोडावूनमध्ये राशनचे धान्य आहे का?कीती पोते धान्य आहे?सदर माल कुठुन आणन्यात आला?तसेच यामध्ये दोषी कोणकोण आहे? याविषयी महसुल आणी पोलिस प्रशासन चौकशी करुन पुढील कारवाई करणार असल्याचे समजले.

मंगरुळपीर हे तांदुळ तस्करीचे राज्यस्तरीय केंद्र बनले असुन याआधीही राशनचे धान्य तस्करीप्रकरणी बर्‍याच कारवाया प्रशासनाकडुन करण्यात आल्या आणी काहींवर गुन्हेही नोंदवण्यात आले आहेत.दि.४ मार्च शुक्रवारी संध्याकाळच्या वेळी मंगरुळपीर शहरालगतच्या स्मशानभुमी जवळच्या एका खाजगी गोडावुनवर मंगरुळपीर महसुल विभागाच्या पुरवठा अधिकारी रुपाली सोळंके,ना.तहसिलदार वाडेकर,तलाठी गजानन महामुने,लिपीक तसेच पोलीस कर्मचार्‍यांच्या पथकाने अचानक छापा टाकुन सदर गोडावुन सिल केले आहे.सदर गोडावूनमध्ये राशनचे तांदुळ आणी राशनचे इतर प्रकारचे धान्य आहे का? याविषयी चौकशी करुन याप्रकरणी दोषींवर कायदेशीर कारवाई होणार असल्याची माहीती सबंधित प्रशासनाकडुन मीळाली आहे.या कारवाईमुळे राशनतस्कराचे धाबे दणानले आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *