वाशिम : नेहमी सामाजिक कार्यात स्वतःला वाहुन घेवून ऊपेक्षित घटकाला न्याय मिळावा आणी मदत व्हावी या दृष्टीकोनातुन झटणार्‍या समाजसेविका ज्योतीताई ठाकरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून जागतिक महिलादिनी मान्यवरांच्या ऊपस्थीतीत सत्कार करण्यात आला.माझा सत्कार हा नेहमी तळागाळातील लोकांसाठी काम करण्यासाठी प्रेरणा देईल असे भावूक ऊद्गार याप्रसंगी ज्योतीताई यांनी काढले.

‘बोले तैसा चाले,त्याची वंदावी पाऊले’ या संतवचनाप्रमाणे फक्त बोलणेच नाही तर प्रत्यक्ष कृतितुन जनसामान्यांसाठी सदैव मदतीसाठी तत्पर असणार्‍या समाजसेविका ज्योतीताई ठाकरे सर्वपरिचित आहेत.ज्योतीताईंनु समाजसेवेतुनच जनमानसांच्या आणी ऊपेक्षितांच्या मनावर आपला ठसा ऊमटवला आहे.

कोरोना काळात गरजुंना किराणा वाटप,मास्क,सॅनिटायझर,भाजिपाला,गृहपयोगी साहित्य,विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,महिलांना आवश्यक आणी गृहपयोगी साहित्याचे मोफत वितरण करत आपल्या लोकोपयोगी भावनेची ओळख सर्वांना करुन दिली.लोकांकडे सर्व ऊपलब्ध असते परंतु गरजुंच्या मुखात आपल्या माध्यमातुन दोन घास पडावेत यासाठी सहसा कुणी पुढाकार घेत नाही परंतु ज्योतीताई ठाकरे यांनी गरजु महिलासह गरीबांनाही मदतीचे पाठबळ दिले.अशा या लोकहितासाठी अहोराञ झटणार्‍या समाजसेविका ज्योतिताईंचा जागतिक महिलादिनाच्या औचित्याने मान्यवरांनी हजारो महिलांच्या ऊपस्थीतीत सत्कार केला.लोकांसाठी मदतीसाठी धावुन जाणार्‍या ज्योतिताईंच्या या सत्काराने त्या भावूक झाल्या आणी हा सत्काराचा क्षण माझ्यासाठी अनमोल असुन मला नेहमी समाजसेवेसाठी प्रेरणादायी असेल असे ऊद्गार याप्रसंगी ठाकरे यांनी काढले.इतरांनीही आपले समाजाप्रती,गोरगरीबांप्रती काही देणे लागते या ऊदात्त भावणेतुन ऊपेक्षितांसाठी कार्य करत मदत करावी असे आवाहनही याप्रंसंगी काढले.या जागतिक महिलादिनाच्या महाराष्ट कामगार कल्याण मंडळ आणी शाक्यमुनी मानव विकास प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमप्रसंगी स्ञी भ्रुण हत्या या विषयावर परिसंवादही घेण्यात आला.यावेळी अध्यक्षस्थानी अवताळे,प्रमुख अतिथी सामाजिक कार्यर्ते सुभाष हातोलकर,व्याख्याता अनिताताई हातोलकर हे ऊपस्थीत होते.या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक प्रमोद घोडचर,शाक्यमुनी मानव विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष देवानंद राऊत हे होते.यावेळी नयना पाटील,जयमाला जाधव,प्रिती अर्धापुरकर,चंदा ठाकुर,बंग यांचेसह बचतगटातील महिलांची ऊपस्थीती होती.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *