पालघर : जिल्हा परिषद पालघर चे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे यांचा जि.प.पं.स.सदस्य असो.महाराष्ट्र मार्फत सर्वोत्कृष्ट उपाध्यक्ष म्हणून केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, पुणे, येथे दिनांक ७ मार्च रोजी हा पुरस्कार सोहळा सम्पन्न झाला.राज्यातील बहुतांश अध्यक्ष, उपाध्यक्ष,सभापती हे यावेळी उपस्थित होते.

जिल्हा परिषद पालघर चे उपाध्यक्ष पद भूषवित असतांनाच उपाध्यक्ष म्हणून विविध कार्यप्रणाली, समाज परिवर्तनाची आणि विकासाची तळमळ, कामातील तत्परता आणि कार्यकुशलता, सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन विविध प्रकारचे कार्य करणाऱ्या आदरणीय ज्ञानेश्वर (शिवा) सांबरे यांच्या कार्याची दखल घेत जिल्हा परिषद व पंचायत समिती अससोसिएशन यांनी कमी कालावधीत सर्वोत्कृष्ट उपाध्यक्ष्य म्हणून महाराष्ट्रात प्रथम तीन मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. चांगल्या कामाची ही पोहोच पावती असून त्याची दखल घेऊन जि.प.पं.स.सदस्य असो.महाराष्ट्र समिती ने सर्वोत्कृष्ट उपाध्यक्ष म्हणून माझी निवड केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी असून मला सन्मानित केले त्याचा उपयोग मी जिल्हयाच्या विकास कामांसाठी करेन अशा भावना उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे यांनी व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *