वाशिम : पोलीस दलामध्ये 16 सप्टेंबर 2021 पासुन डायल 112 हा महत्त्वकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला असुन या प्रकल्पाचा उददेश पिडीत जनतेला आधुनिक साधन व तंत्रज्ञानाच्या मदतीने कमीत कमी वेळेत मदत पोहचविणे हा आहे. वाशिम पोलीस दलामध्ये या प्रकल्पाकरीता एकुण 41 वाहने कार्यरत आहे. डायल 112 या प्रकल्पाचे प्रशिक्षण दिलेला स्टाप सुध्दा तैनात करण्यात आला आहे.


या अनुषंगाने मा पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांनी वाशिम जिल्हयातील डायल 112 च्या कामकाजाचा आढावा घेण्याकरीता दिनांक 08.03.2022 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या व्हिडीओ कॉन्फरन्स करीता वेगवेगळया पोलीस स्टेशन स्तरावरून 16 पोलीस अधिकारी व 70 पोलीस अंमलदार (प्रथम प्रतिसाद पथकातील अंमलदार) हे हजर होते. यावेळी पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या समस्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पोलीस अधीक्षक यांनी जाणुन घेतल्या तसेच वाशिम जिल्हयाचा प्रतिसादाचा वेळ कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे बाबत मार्गदर्शन केले.

डायल 112 चे कामकाजा बाबत माहिती देतांना वाशिम जिल्हयाचा माहे सप्टेंबर 2021 चा प्रतिसादाचा सरासरी वेळ 21 मिनीटाचा असुन सध्या तो कमी करून 14 मिनीटापर्यंत कमी झाला असल्याचे सांगितले.तसेच डायल 112 हा प्रकल्प कार्यान्वीत झाल्यापासुन सर्वात जास्त महिलांसबधीत एकुण 326 कॉल, गुन्हयाचे संबधीत 296 कॉल, चौकशी करीता 281 कॉल, रस्ते अपघात संबधीत 150 कॉल, माहितीसाठी 127 कॉल असे जास्तीत जास्त कॉल प्राप्त झाले आहेत. तसेच सर्वात जास्त कॉल पोलीस स्टेशन वाशिम शहर 278 कॉल, पोलीस स्टेशन रिसोड 162, पोलीस स्टेशन मालेगाव 161 कॉल, पोलीस स्टेशन मंगरूळपीर 141 कॉल, पोलीस स्टेशन कारंजा शहर 127 कॉल असे पोलीस स्टेशन नुसार जास्तीत जास्त कॉल प्राप्त झाले आहे. आजपावेतो एकुण 1435 कॉल नियंत्रण कक्ष येथे प्राप्त झाले आहे. तसेच डायल 112 या प्रकल्पावर कॉल येण्याचे प्रमाण सायंकाळी 06.00 PM पासुन ते रात्री 11.00 PM चे दरम्यान जास्तीत जास्त कॉल नियंत्रण कक्षाला प्राप्त होत आहे. अशा प्रकारचे कॉल प्राप्त होणा-या ठिकाणीची माहिती घेवुन अशा संवेदनशिल ठिकाणी वाशिम पोलीस दलाचे वतिने डायल 112 चे वाहनाकरीता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फिक्स पॉईंट व गस्तीचा विभाग ठरवुन दिलेला आहे. त्यामुळे पिडीत व्यक्तींना कमीत कमी वेळेत प्रतिसाद देण्यास व गुन्हेगारी कृत्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे.याकरीता पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांनी वाशिम पोलीस दलातील प्रथम प्रतिसाद पथक म्हणुन कार्यरत असलेले पोलीस अंमलदार व नियंत्रण कक्ष येथे असलेले प्रेषक व पोउपनि जंजाळ यांचे पथकाने सप्टेंबर 2021 चे प्रतिसादाचा वेळ 21 मिनीटावरून माहे फेब्रुवारी 2022 चा प्रतिसादाचा वेळेत सुधारणा करून 14 मिनीट केल्याने त्यांचे कौतुक केले. तसेच या वेळे मध्ये सुध्दा आणखी सुधारणा करून 10 मिनीटापर्यंत कमी करण्याचे
प्रयत्न करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *