उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा येथे कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर,उमेद उमरगा आणि ग्रामपंचायत कलदेव निंबाळा यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते १८ मार्च असे तीन दिवस प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.प्रशिक्षणाचे उद्घाटन जेष्ठ समाजसेवक पन्नालाल सुराणा यांच्या हस्ते झाले.लघू उद्योग,जोडधंदे हीच ग्रामीण भारताची अर्थव्यवस्था आहे.त्यास प्रोत्साहन देणे अत्यावश्यक आहे असे मत यावेळी व्यक्त केले.

तर ग्रामपंचायतीच्या सभागृहात प्रशिक्षण समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनिता पावशेरे होत्या.सरपंच पावशेरे, उमेदचे तालुका व्यवस्थापक विवेक पवार ,उद्दोजक श्रावण रावणकुळे,उमेद कृषी संघटक किशोर औरादे, ओबीसी संघटनेचे मारुती सुरवसे यांच्या हस्ते यावेळी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. शेळी पालन यावर गुंडू पवार व डॉ विजयकुमार जाधव यांनी मार्गदर्शन केले.तर कुक्कुट पालन यावर विवेक पवार यांनी मार्गदर्शन केले. तावशीगड येथील बिराजदार यांच्या बंदिस्त शेळी गोट फार्म केंद्रास भेट देवुन विविध जातींच्या शेळया बोकड आदी माहिती घेण्यात आली. नळदुर्ग येथील गुंडू पवार यांच्या फार्म हाऊसवर कृषी अनुभव चर्चा उपक्रम घेण्यात आला.

तसेच तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्र परीसरातील सर्व प्रकल्पाची, विभागाची माहिती घेतल्यानंतर कार्यक्रम समन्वयक डॉ देशमुख ,डॉ. वर्षा मरवाळीकर डॉ.विजय जाधव, डॉ आरबाड हवामान शास्त्रज्ञ डॉ नकुल हरवाडकर डॉ गणेश मंडलीक डॉ श्रीकृष्ण झगडे यांनी अजोला खाद्य, हवामानशास्त्र, गृहविज्ञान,नॅडप , निंबोळी अर्क, पोषण बाग, वृक्षलागवड, अवजारे उपकरणे व यंत्रे,शेळी व कुक्कुट पालन आदींची माहिती देवून मार्गदर्शन केले. कृषी अभ्यास दौर्यात महिला,युवक शेतकर्यांनी सहभाग नोंदविला.प्रशिक्षण शेतकरी अभ्यास दौरा शेतकर्यासाठी निश्चीतच मार्गदर्शक व उपयुक्त ठरला अशी प्रतिक्रिया सरपंच सुनिता पावशेरे आणि महिला शेतकर्यांनी दिली.यावेळी पोलीस पाटील पांडूरंग पाटील, प्रभाकर बिराजदार,अशोक सुर्यवंशी,समीर कांबळे,निशा घोटमाळे, प्रियंका घंटे, गहिनीनाथ बिराजदार, बालाजी गुरव, यांच्यासह महिला युवक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमात प्रस्तावना व सुत्रसंचालन देविदास पावशेरे यांनी केले तर आभार किशोर औरादे यांनी मानले.
सचिन बिद्री, उमरगा-उस्मानाबाद