पालघर : मा. निलेश भगवान सांबरे यांच्या नेतृवाखालील दाभोन आरोग्य वर्धीनी पथक मुरबी पाडा ता. डहाणू जिल्हा पालघर*गेल्या 3 वर्षा पासुन बंद अवस्थेत होते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांना माहिती मिळताच दाभोन आरोग्य वर्धीनी केंद्रास प्रात्येक्ष भेट देऊन पाहणी केली व यांच्या गावकऱ्यांच्या उपस्थिती आरोग्य विभागाकडे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था मार्फत वर्धीनी केंद्र चालू करण्यासाठी पत्र व्यवहार करण्यात आला.
पत्रा नुसार आज दिनांक 21/03/2022 रोजी जर आरोग्यवर्धिनी पथक चालू झाले नाही तर तालुका आरोग्य अधिकारी यांच्या दालनात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. परंतु तालुका आरोग्य अधिकारी यांनी स्वतः आरोग्यवर्धिनी केंद्र दाभोन येथे उपस्थित राहून चार कर्मचारी तात्काळ नेमून आरोग्यवर्धिनी केंद्र नागरिकांसाठी सुरू केले व लेखी स्वरूपात लिहून देण्यात आले .
उपस्थित सर्व नागरिक आरोग्यवर्धिनी केंद्र चालू झाल्यामुळे खूप आनंद व्यक्त केला आणि जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री निलेशजी भगवान सांबरे यांचे खूप खूप आभार व्यक्त करून असेच सहकार्य आमच्या गावाला नेहमी असू द्या अशी आशा व्यक्त केली. यावेळी जिजाऊ जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य सदस्य संदेश ढोणे, जावेद खान, चंदू घाटाल,पिंटू रिंजड प्रशांत उराडे आदी मान्यवर उपस्थित होते