पालघर – डहाणू तालुक्यातील सायवन येथील सध्या स्थितीत असलेली बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा चारोटी नाका येथे जोडली जाणार असल्याने या बँकेतील सुमारे २८ हजार खातेधारकांना याचा फटका सहन करावा लागणार आहे , सरकारी विभागातील आजी माजी कर्मचारी यांच्यासह विद्यार्थ्यां वर्गाची खाती देखील या बँकेत आहेत , सायवन येथे असलेल्या सध्या स्थिती बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे स्थलांतरण चारोटी नाका येथे झाले असता येथील आदिवासी बांधवांसह निवृत्त कर्मचारी व विद्यार्थी वर्ग यांना जवळ जवळ २०कि.मी च्या अंतराची पायपीट करावी लागेल .

नागरिकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे त्या ठिकाणी कायम राहण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी डहाणू तालुका अधक्ष श्री.अरुण नीकोले आणि कार्यकर्ते यांच्या कडून प्रांत कार्यालय , डहाणू तहसीलदार कार्यालय व पंचायत समिती डहाणू यांना निवेदन देण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *