औरंगाबाद : तीसगाव येथील पारिजातनगरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी (ता. १८) शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटन उपसरपंच नागेश कुठारे यांचे हस्ते फित कापून झाले.


क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मुख्याध्यापक नितीन घोडके यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे नागेश कुठारे यांनी शाळा व अंगणवाडीच्या सर्व समस्या ग्रामपंचायतीकडून सोडविण्याचे आश्वासन मेळाव्यात प्रत्यक्ष ९ विद्यार्थ्यांचे इयत्ता १ ली मध्ये प्रवेश निश्चित करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. केंद्रप्रमुख ए जे ठाकरे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी अंगणवाडी कर्मचारी निता कसुरे, एस आर दिघोळे, मदतनीस ललिता कसूरेझ एम एम गायकवाड, शाळा समिती सदस्य, शिक्षक, पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शिक्षिका जे डब्ल्यू सांगोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
NTV न्युज मराठी, वाळुज औरंगाबाद- 8484818400

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *