उस्मानाबाद : नळदुर्ग मार्गे सोलापुरकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ सोलापुर-हैद्राबाद रोड वरून वाहनांतुन गांजा जात असल्याची माहिती नळदुर्ग पोलिसांना मिळाली यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे व इतर अधिकाऱ्यांनी सोलापुर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील फुलवाडीजवळील टोल नाक्याच्या पुढे १०० मीटर च्या अंतरावर नाकाबंदी केली.यावेळी नाकाबंदी दरम्यान संशयीत कारला अडवुन त्याची झाडाझडती घेतली असता त्या कारमध्ये तब्बल १०२ किलो गांजा मिळुन आला. या गांजाची एकुण किंमत १५ लाख ४३ हजार रुपये असुन गाडीसह एकुण १८ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतुन अभिनंदन होत आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की २६ एप्रिल रोजी नळदुर्ग पोलिसांना सोलापुर–हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरून नळदुर्ग मार्गे सोलापुरकडे कारमधुन गांजा जात असल्याची माहिती मिळाली. यावरुन उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर मोटे, पिराजी तायवाडे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सोलापुर–हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील फुलवाडी टोलनाक्याच्या पुढे थोड्या अंतरावर नाकाबंदी केली. यावेळी सकाळी साडेअकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान संशयीत कार क्र. एम. एच. १२ एनबी २६२९ ही कार भरधाव वेगाने जात असताना पोलिसांनी त्या कारला अडविले. कार थांबल्यानंतर कारची झाडाझडती घेतली असता कारमध्ये तब्बल १०२ किलो गांजा आढळुन आला ज्याची किंमत १५ लाख ४३ हजार रुपये इतकी आहे. यावेळी पोलिसांनी कारसह एकुण १८ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गणेश नन्नवरे वय २९ रा. दहिवडी ता. माढा व तुषार काकडे वय २६ रा इंदापुर जिल्हा पुणे या दोघांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या एक दीड वर्षांतील नळदुर्ग पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई आहे. सोलापुर–हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावरून नळदुर्ग मार्गे अनेक पदार्थांची तस्करी ही सुरूच असते.पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचुन मोठ्या शिताफीने हा गांजा पकडला आहे

प्रतिनिधी आयुब शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *