काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांचा काॅग्रेसला सोड चिठ्ठी
हिंगोली : काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यानी 2007 मध्ये शिवसेनेला सोठचिठ्ठी देत काॅग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता काॅग्रेस सोबत निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती याची दखल घेत तात्कालिक खासदार राजीव सातव यांनी त्यांच्यावर काॅग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली होती संजय बोंढारे यांनी तात्कालिक खासदार राजीव सातव, आमदार संतोष काळे यांच्या सोबत कळमनुरी हिंगोली मतदार संघात गावागावात जाऊन काॅग्रेस पक्षवाढीसाठी प्रयत्न केले होते त्यामुळे काॅग्रेसला आच्छे दिन दाखवले होते
संजय बोंढारे यांनी तात्कालिक खासदार राजीव सातव, आमदार संतोष काळे यांच्या सोबत कळमनुरी हिंगोली मतदार संघात गावागावात जाऊन काॅग्रेस पक्षवाढीसाठी प्रयत्न केले होते त्यामुळे काॅग्रेसला आच्छे दिन दाखवले होते मागील काही दिवसांपासून संजय बोंढारे यांची काॅग्रेस पक्षात कुचंबना होत असल्याने त्यांनी 30 एप्रिल शनिवार रोजी मुंबई येथे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधुन शिवसेनेत घरवापसी केली यावेळी कळमनुरी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर, महेशलाड, युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम,राम नागरे, शेषराव बोंढारे,संजय इंगळे,फेरोज शेख आदिची उपस्थित होते संजय बोंढारे यानी काॅग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने काॅग्रेसला मोठा धक्का बसला असुन त्याच्या जागी काॅग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी काॅग्रेसचे कळमनुरीचे माजी आमदार संतोष टारफे यांच्यावर दिली जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.