section and everything up until
* * @package Newsup */?> गोंदीया जिस्ह्यातील देवरी शहरांचे नियोजन आणि पाणी पुरवठ्याचा प्रश्न | Ntv News Marathi


गोंदीया जिल्ह्याच्या देवरी शहरांतील प्रभाग क्रमांक 12 मध्ये राहणाऱ्या नागरिकांना पाण्याची समस्या सतत भेडसावत असल्याचे चित्र आहे. शहरातील नगरंचायत यंत्रणांकडून प्रभाग क्रमांक 12 तील रहिवाशांना रोजच्या वापरासाठी पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. प्रभागामध्ये पाणी पुरवठ्याच्या सुविधा असल्या व तेथील जलवाहिन्यांमध्ये पाणी कमी सोडले जात असल्याने हजारो कुटुंबांना भर उन्हाळ्यात पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.

व्यवस्थापनातील त्रुटी यामागचे महत्त्वाचे कारण असल्याचे या समस्येचा खोलात जाऊन अभ्यास केल्यानंतर आढळून येते. त्यामुळेच गेल्या काही महिन्यापासून  परिस्थिती सुधारण्यापेक्षा अधिकाधिक बिघडत चालली आहे. सुमारे २ ते ३ वर्षांपूर्वी लोकसंख्या कमी असल्यामुळे पाण्याची मागणी कमी होती, त्यामुळे त्यावेळी होणारा पुरवठा आणि पाण्याचा दाब पुरेसा असायचा. त्यावेळी पाणी दररोज मिळायचे. पाणीपुरवठ्याच्या वेळा ठरलेल्या होत्या. शिवाय, पाण्याचा दाब चांगला असल्याने इमारतींच्या छतांवरील टाक्यांमध्ये पाणी चढवण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर पंपांची गरज लागत नव्हती. मात्र, दिवसागणिक परिस्थिती बदलत गेली.  उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाण्याची मागणीही वाढली.

सध्या स्थितीत देवरी नगरंचायत यंत्रणांकडून नागरिकांना दिवसातून फक्त ऐकच दा 10 ते 15 मिन्टं तेही सकाळी ऐकच वेळा जलवाहिन्यांमध्ये पाणी सोडून पुरवठा केला जात आहे. ज्यामुळे देवरी शहरातील प्रभाग क्रमाकं 12 सह अनेक प्रभागात नागरीकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. काही महिन्या अगोदर दिवसातून दोन वेळा पाणी यायचा , तर कधी येत नव्हता. सध्या उन्हाळ्याचे दिवस असुनही शहरातील नागरीकांना पाणी नेमके कोणत्या वेळेला सोडले जाणार आहे याची माहिती लोकांना दिली जात नाही. उलट नळातील पाण्याचा दबाव व पाणी कमी प्रमानात व कमी वेळ येत असल्याने पाणी मिळेल की नाही, मिळाले तर ते कधी मिळेल याबाबत लोकांमध्ये संभ्रम पहायला मिळत आहे.

अनेक कुटुंबांनी आपापल्या पद्धतीने शोधले उपाय ..
नगरंचायतच्या कमी दबाव व अनयोजीत वेळेमुळे लोकांनाही आता सवय झाली आहे. पाणी कधी येणार? किती वेळ येणार? आले तर किती दाबाने येणार? ते चांगले असेल की नाही याची चिंता सर्वांनाच असते. या सगळ्या अडचणींना तोंड देण्यासाठी काही कुटुंबांनी आपापल्या पद्धतीने उपाय शोधले आहेत. नगरंचायतीने सोडलेले पाणी जलवाहिन्यांच्या माध्यमातून घरात येईपर्यंत त्याचा दाब कमी झालेला असतो. पाणी जास्त दाबाने यावे यासाठी अनेक नागरीकांनी थेट नगररंचायतीच्या जलवाहिन्यांनाच शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटर पंप जोडलेले आहे. अशा पद्धतीने लोक जास्तीत जास्त प्रमाणात पाणी मिळवतात. मोटरच्या दाबामुळे जलवाहिन्यांतील सूक्ष्म कचराही खेचला जातो. या सगळ्या प्रक्रियेत पाणी दूषित होण्यास हातभार लागतो. नगरंचायतीच्या जलवाहिन्यांमधून इलेक्ट्रिक मोटरने पाणी खेचणे अनेक कुटुंबांना पटत नाही. त्यांना ती गोष्ट चुकीची वाटते. मात्र, सरळमार्गाने पाणीच मिळत नसल्याने त्यांना अशा गोष्टी कराव्या लागत आहेत.

पाणी वाटपाची समस्या अधिकच तीव्र
नागरिकांना पाणी पुरवठा करण्याचा नगरपंचायतचा सध्याचा दृष्टिकोन एका विशिष्ट उद्देशाने व तात्कालिक आहे. रहिवाशांना नियमित, पुरेसे व स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवण्याची हमी ही व्यवस्था देत असली तरी, पाण्याच्या कमी वाटपामुळे असमान पाणी वाटपाची समस्या अधिकच तीव्र झाली आहे. ही परिस्थिती म्हणजे धोक्याची घंटा आहे. नगरंचायत यंत्रणांचा कारभार कार्यक्षम करण्याची व पाणी पुरवठ्याचे सूत्र नगरंचायत प्रशासनाने अंमलात आणणे गरजेचे आहे. पाण्याची उपलब्धता आणि दर्जा या बाबतीत नगरपंचायतने प्रत्येक घरातून अभिप्राय घ्यायला हवा. पाणी पुरवठ्याच्या वेळा निश्चित असायला हव्यात. त्या वेळापत्रकानुसारच नगरपंचायतने पाणी सोडायला हवे. पाण्याच्या वेळांबाबत रहिवाशांना माहिती दिली जावी. जलवाहिन्यांमधील पाण्याचा दाब, साठवण टाक्या आणि जलवाहिन्यांतील पाण्याच्या दर्जाची पाहणी करण्यासाठी नगरपंचायतने योग्य तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. नगरंचायत यंत्रणांनी उन्हाळ्याचे दिवस असल्याने दिवसा जास्तीत जास्त वेळ पाणी सोडण्याचे प्रयत्न करावेत. तसेच, २४ तास पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करावेत. पाण्याच्या गैरवापरामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या समस्यांबाबत ग्राहकांमध्ये जनजागृती केली पाहिजे.

प्रतिनीधि:- मुकेश खरोले, गोंदीया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *