उस्मानाबाद : रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 च्या वतीने 2020-21 चा आदर्श गाव पुरस्कार रोटरी क्लब उमरगा च्या वतीने इंटिग्रेटेड व्हिलेज डेव्हलपमेंट अंतर्गत दत्तक घेतलेल्या जकेकुरवाडी गावास मिळाला आहे. या पुरस्काराचे वितरण रोटरी डिस्ट्रिक्ट चे माजी गव्हर्नर डॉक्टर दीपक पोफळे, पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील, रोटरी क्लबचे ट्रेनर प्रा संजय अस्वले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला व
या कार्यासाठी पुढाकार घेणारे सरपंच अमर सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला.

रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टचा “आदर्श गाव” पुरस्कार जकेकुरवाडीस

येथील रोटरी क्लब उमरगा च्या उमरगा च्या वतीने रोटरी इंटरनॅशनल इंटिग्रेटेड विलेज डेव्हलपमेंट अंतर्गत दत्तक गाव म्हणून विविध उपक्रम 2020- 21 या रोटरी वर्षांमध्ये राबवण्यात आले आहेत. यामध्ये जलसंधारण, आरोग्य शिबिर, विमा योजनेची शिबिर, कोरणा जनजागृती मोहीम, गावातील नाल्या व रस्ते दुरुस्ती, जिल्हा परिषद शाळेचे व ग्रामपंचायतीचे नूतनीकरण, महिला सबलीकरण अंतर्गत महिलांना शिलाई मशीन, ज्येष्ठ नागरिकांसाठी रोटरी ग्रंथालय, लसीकरण आणि मास्क वापरा याबाबत समुपदेशन आदी उपक्रम राबविण्यात आले आहेत त्यामुळे गावांमध्ये परिवर्तन झाले आहे. याची दखल घेऊन रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट 3132 च्या वतीने व रोटरी क्लब उमरगा यांच्यावतीने 2020-21 या वर्षासाठी जकेक्कूरवाडी हे गाव आदर्श गाव म्हणून गौरवण्यात आले आहे असे प्रतिपादन रोटरीचे माजी गव्हर्नर पोफळे यांनी म्हटले आहे.

यावेळी उमरगा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील यांनी आपल्या अभिनंदन पण मार्गदर्शनात जकेक्कूरवाडी या गावाचा आदर्श इतर गावांनी घ्यावा आणि रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट रोटरी क्लब उमरगा च्या कार्याचे कौतुक केले. असे उपक्रम उमरगा तालुक्यातील इतर गावातही राबवावेत आणि तालुक्यातील गावे आदर्श करावीत असे आवाहन केले.
या उपक्रमासाठी रोटरी क्लब उमरगा च्या वतीने स्थापन केलेला राजे शिवाजी रोटरॅक्ट क्लब ज्येष्ठांसाठी स्थापन केलेला रोटरी कम्युनिटी कॉर्प्स श्री गणेश तसेच गावातील इतर सामाजिक संघटना, युवक, नूतन ग्रामपंचायतीतील सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला. या सर्वांना प्रमुख मार्गदर्शन श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर संजय अस्वले यांनी केले आहे. या उपक्रमासाठी क्लबच्या अध्यक्षा कविता अस्वले, सचिव अनिल मदनसुरे, इंटिग्रेटेड व्हिलेज डेव्हलपमेंट डायरेक्टर डॉ. धनंजय मेनकुदळे, प्रा युसुफ मुल्ला, प्रदिप पाटील, डॉ. विनोद देवरकर, साईनाथ पिस्के यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच या कार्यक्रमासाठी जकेकुर चे सरपंच अनिल बिराजदार, गुगळगावचे सरपंच शशिकांत व्हनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *