लातुर : ग्लोबल आविष्कार फाउंडेशन नांदेडच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार सचिन मंगनाळे यांना राज्यांचे पूर्व उच्च तंत्र शिक्षणराज्य मंत्री तथा पूर्व पालकमंत्री नांदेडचे मा आ. डी. पी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली महापौर सौ जयश्री निलेश पावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला प्रत्येक वर्षी विविध कार्यक्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवर यांना पुरस्कार देण्यात येत असतो या वर्षीचा अतिशय प्रतिष्ठेचा समाजाला जाणार राज्यस्तरीय कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार हंडरगुळी येथील लोकअस्मिता चॅरिटेबल ट्रस्ट चे सर्वे सर्वा सचिन मंगनाळे यांनी सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याने त्यांना हा सपत्नीक पुरस्कार प्रदान करण्यात आला.सचिन मंगनाळे हे वृक्ष लागवड, व्यसनमुक्ती, विद्यार्थी पालक यांचा गौरव सोहळा,रक्तदानशिबिर,गरीब महिलांना साडी चोळी वाटप,विविध महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करणे त्या माध्यमातून महापुरुषांच्या विचाराचा वारसा व्याख्यान आपल्या वक्तृत्वा द्वारे लोकांपर्यंत पोहचवणे,जातीभेद निर्मूलन काम करणे,कीर्तन ,लोकगीत या माध्यमातून जनजागृती करणे,पत्रकारिता माध्यमात सुध्दा उत्कृष्ट काम केल्यामुळे या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला यथायोग्य पुरस्कार मिळाला…

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पूर्व उच्च शिक्षण तंत्रमंत्री मा आ डी. पी. सावंत होते तर मुख्य निमंत्रित म्हणून महापौर सौ जयश्री निलेश पावडे व स्वराती नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू मा उध्दव भोसले उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून (भाप्रसे)मुख्यकार्यकारी अधिकारी जि प नांदेड बबन जोगदंड.विभाग प्रमुख माध्यम प्रकाशन केंद्र यशदा पुणे. एकनाथ उर्फ अनिल मोरे. सिने अभिनेते सदस्य जिल्हा नियोजन समिती नांदेड, मा डॉ गोविंद नांदेडे पूर्व प्राथमिक शिक्षण संचालक महा राज्य मा शिवाजीराव कपाळे पूर्व अति. मुख्यकार्यकारी जि प परभणी मा प्रशांत प्रकाश दिग्रसकर शिक्षणधिकारी माध्य. जि प नांदेड सौ सविता बिरगे शिक्षणाधिकारी प्राथमिक जि. प नांदेड मा डॉ.सानवी जेठवणी प्रवक्ता भारतीय संस्कृती व संवर्धन समितीभारत सरकार इत्यादि मान्यवर उपस्थित होतेया कार्यक्रम यशस्वी तेसाठी ग्लोबल फाउंडेशन चे अध्यक्ष प्रलोभ कुलकर्णी,उपाध्यक्ष जनक गादगे सचिव बालाजी तोरणेकर, कोषाध्यक्ष रुपाली आडगावकर सहसचिव दयानंद कोजीवले ,संघटक प्रमोद फुलारी, सहसंघटक सावित्रीबाई तोरणेकर यांनी प्रयत्न केले. मा. सचिन मंगनाळे यांना हा पुरस्कार मिळाल्याने सर्व क्षेत्रांतील लोकांतुन मोठ्या प्रमाणात अभिनंदन होत आहे.
लक्ष्मीकांत मोरे
एन.टिव्ही.न्युज मराठी
उदगीर जळकोट प्रतिनिधी लातुर
दि.०६/०५/२०२२
मो.नं.९१३०५५३९९७, ९०२२४९३४९१