गोंदीया:-जिल्ह्याच्या चिचगड पोलिस्टेन हद्दीत छत्तीसगड वरुन ककोडी-चिचगड मार्गे अवैध जनावरांची वाहतूक जोमात चालू असून या अवैध जनावरांच्या वाहतुकीला चिचगड पोलिसांचे पाठबळ असल्याचा आरोप चिचगड पोलिस्टेसन हद्दीतील नागरिक करीत आहेत. रात्री व सकाळच्या 2 ते 5 वाजता दरम्यान अवैध जनावरांची वाहतुक होत आहे. कायद्याने अवैध जनावरांची वाहतुकीवर बंदी असली तरी ककोडी-चिचगड मार्गे मोठ्या प्रमाणात अवैध जनावरांची वाहतुक चालू असून शासन नियम धाब्यावर बसवून जनावर कोंबून नेल्या जात असल्याची चांगलीच चर्चा चिचगड-ककोडी गावात रंगली आहे.

याला पायबंद घालण्याची जबाबदारी असलेले चिचगड पोलिस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी मात्र या अवैध जनावरांच्या वाहतुकीच्या माध्यमातून मिळणार्‍या अल्पसा मलाईसाठी शासनाच्या नियमानां हुलकावून अवैध जनावरांची तस्करी करनार्या वाहतूकदारांना पाठीशी घालत आहेत. एवढा गंभीर प्रकार ठाणेदारांच्या डोळ्यांदेखत घडत असतानां देखील ठाणेदार साहेब मात्र यावर कारवाई करण्याचे सोडून तेसुद्धा एक प्रकारे या गंभीर प्रकाराला पाठबळच देत आहेत. त्यामुळे काही महिन्या अगोदरच रूजू झालेले उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर या प्रकाराकडे लक्ष घालून या जनावरांच्या अवैध वाहतुकीवर आळा घालावा अशी मागणी ककोडी-चिचगड येथिल नागरिक करीत आहेत.

प्रतिकिया
चिचगड पोलिस्टेसन नक्षलग्रस्त भागात असल्याने रात्रीची गस्ती करन्यास पोलिस कर्मचार्यानां मनाई केलेली आहे. तरी आम्हाला तक्रार आलि की त्या तक्रारीची दखल घेत त्यावर चिचगड पोलिस विभागातर्फे कारवाई करन्यात येते. – अजय भुसारी (ठानेदार चिचगड)

काही महिन्या अगोदरच बंजरग दलानी पकडली होती जनावरांची गाडी
ककोडी-वरुन चिचगड मार्गे येनार्या चिचगड टी पॉंईटवर अवैध जनावंराना सहा चाकी वाहनात कोबुंन नेत असलेल्या २६ जनावरांच्या वाहनाला बंजरगं दलाने सकाळच्या सुमारास पकडले होते. त्यावर चिचगड पोलिसानीं गुन्हा दाखल करीत चारचाकी वाहनाला ताब्यात घेतला होता. त्यानंतरही रात्री दरम्यान जनावरांची तस्करी जोमात सुरू असल्याने यात कोन – कोनाचा सहभाग आहे हे विचारधिन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *