उस्मानाबाद : उमरगा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रशासनाने कोवीड १९ मध्ये फीस माफ करण्याचे आदेश दिले असताना उमरगा तालुक्यातील इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळा बंद असतानाही पालकाकडून सक्तीने फिस वसुली करत असल्याने सदरील फिस वसुली बंद करण्यासंदर्भात माननीय तहसीलदार संजय पवार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना दि .२९ रोजी निवेदन दिले आहे .
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात कोरोना महामारीमुळे मागील वर्षापासून शाळा बंद आहेत .

महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांची फीस आकारू नये असे आदेश दिले आहेत . तरीही काही इंग्रजी माध्यमांच्या शाळा व इतर काही शैक्षणिक संस्था विद्यार्थी व पालकाकडून सक्तीने वसुली करीत आहेत . फिस न दिल्यास विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातून काढून टाकने , पुस्तके घेऊ न देणे असा त्रास देत आहे . शाळा बंद असतानाही लाखो रुपयांची वसुली शाळा फिस च्या माध्यमातून करीत आहेत .
मागील दोन वर्षापासून कोरोना महामारी मुळे व्यवसाय शेती व इतर अस्थापना आर्थिक अडचणीत आलेल्या आहेत . त्यामुळे मा . जिल्हाधिकारी साहेबांनी इंग्रजी शाळांसह मराठी माध्यमांच्या शाळांनाही सक्तीचे आदेश देऊन फीस माफ करण्यास कळवावे . शाळांनी यापुढे फीस वसुली चालू ठेवल्यास व फिस माफ न केल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शाळांना टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल .अशा स्वरूपाचे निवेदन देण्यात आले आहे.

शैक्षणिक फीस माफीसाठी युवक राष्ट्रवादीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

निवेदनावर राष्ट्रवादी युवक कांग्रेस उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष बाबा पवार , उमरगा युवक तालुकाध्यक्ष शमशोद्दीन जमादार, युवक शहर अध्यक्ष सुशील दळगडे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष समर्थ सुरवसे ,अल्पसंख्यांक विधानसभा युवक अध्यक्ष मोहसिन पटेल, मुरूम विद्यार्थी शहराध्यक्ष सुरज सूर्यवंशी, फयाज पठाण, ओमकार फुकटे, अजिंक्य बिराजदार, जुबेर पटेल, फयाज पटेल, विशाल मुगळे, समीर शेख, किरण कांबळे, सोमनाथ कांबळे, निसार शेख, अनिकेत तेलंग, संजय अंगबरे, कृष्णा पाटील आदींच्या निवेदनावर सह्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *