तलाठ्या विरोधात देवरी पोलीसात गुन्हा दाखल…

गोंदिया : जिल्ह्याच्या देवरी तालुक्यासह ग्रामीण भागात महसूल प्रशासनाचा तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्यावर अंकुश नसल्याने मोठ्या प्रमाणावर तलाठी त्यांना नेमून दिलेल्या कार्यस्थळी उपलब्ध राहत नसल्याचे दिसून येत आहेत.तर तालुक्यातील अनेक तलाठी दबंग गीरी करतानीं दिसत आहेत.असाच प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरात घडला असुन देवरी तालुक्यातील चिचगड येथिल तलाठ्यानी देवरी येथिल श्री गणेश मेडीकल मालकाला माझ्यासी औषधीचे पैसे मागतोस म्हनुण मारपीट करत दबंग गीरी केली आहे.

सविस्तर व्रुत्त असेकी, देवरी शहरातील पोलिस्टेसन समोर असलेल्या श्री गणेश मेडीकल मालक अरविंद शेन्डें हे रात्री ९.३० वाजता आपली मेडीकल बंद करीत असतानीं चिचगड तलाठी कार्यालयाचे तलाठी प्रकाश चव्हान यानीं मेडीकल मालक अरविन्दं शेन्डें यानां औषधी मागीतली. तसी त्यानीं ३० रुपयांची औषधी तलाठी यानां दीली. मग शेन्डें यानीं तलाठ्यास औषधीच्या पैसाची मागनी केली असता तलाठी प्रकास चौव्हान यांनी मेडीकल मालक अरविंद शेन्डें यानां तु मला औषधिच्या पैस्याची मागनी कसी केली मला ओळखत नाही का..? व अस्लील भाषेत शिवीगाळ करत मारपीट केल्याने. मेडीकल मालक अरविंद शेन्डें यानीं देवरी पोलीसात तक्रार दाखल केली. त्यावर देवरी पोलिसानीं भारतीय दंड सहिंता कलम ३२३, ५०४, ५०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर तलाठ्यावर देवरी पोलिस्टेसनला या अगोदरचाही जुगार खेळतेवेळी अटकेचाही गुन्हा दाखल करन्यात आला होता.

विशेषता या तलाठ्याच्या दबंग गिरीमुळे मेडीकल अशोसीयसन संघटनेत संतापाची लाट निर्मान झाली असुन देवरी येथिल उपविभागीय अधिकारी दोषी तलाठ्यावर काय कार्यवाही करतात कि त्या तलाठ्याला सहकार्य करतात याकडे मेडीकल अशोसीऐसन व देवरी तालुका वाशीयांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात मेडीकल मालक अरविन्दं शेन्डें यानी स्थानीक तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधीकारी यांच्याकडे चिचगडचे तलाठी प्रकाश चव्हान यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *