उमरगा प्रतिनिधी

सिद्धार्थ गौतमाचे महाभीनिशक्रमन हेच बुद्धत्व प्राप्तीचे महाद्वार ठरले आहे. सिद्धार्थ गौतमानी आपल्या पत्नीला यशोधरेला सांगून संसाराचा भार तिच्यावर सोपवून गृहत्याग केला वं सत्याच्या शोधाकरीता यशोधरेनी सिद्धार्थाना सात दिली त्यामुळेचं सिद्धार्थ बुद्ध झाले असल्याचे मत धम्ममित्र जीं. एल. कांबळे यांनी व्यक्त केलें.

तालुक्यातील कसगी येथील बुद्ध जयंती दिनाच्या निमित्याने आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना धम्ममित्र जी. एल. कांबळे

तालुक्यातील कसगी येथील नालंदा बौद्ध विहारात बुद्ध पौर्णिमेच्या निमित्याने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात तें प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी गावच्या सरपंच सौ बबीता कांबळे, जेष्ठ बौद्ध उपासक तुकाराम गायकवाड, संतोष पाटील, श्रीमंत कांबळे, जयंती कमिटीचे अध्यक्ष कमलाकर कांबळे, उपाध्यक्ष सुमेध सोनकांबळे, शिलन कांबळे आदींची उपस्थिती होती.प्रारंभी मान्यवराच्या हस्ते तथागत भगवान बुद्धाच्या मूर्तिचे पूजन करण्यात आले.
पुढे बोलताना श्री कांबळे म्हणाले की, बौद्ध धम्म हा विराचा आदर्श आहे. सिद्धार्थ गौतम वीर होते त्यानी अनेक वेळा आपले विरत्व सिद्ध केलें आहे. त्याच्या बालपनी घडलेला हंसाचा संदर्भ हा विरतेचीं साक्ष देतो. तथागत गौतम बुद्धांनी दया, क्षमा, शांती, त्याग, सेवा, समर्पणाचा संदेश देऊन आदर्श जीवनाचा मार्ग दाखवला. गौतम बुद्धांच्या विचारातच मानवजातीचं,अखिल विश्वाचं कल्याण सामावलं आहे. बुद्धांचे विचार दु:खांचा विनाश करुन मानवी जीवन सुखमय करत बुद्ध पौर्णिमेनिमित्त गौतम बुद्धांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करुन आपण आपले जीवन जगले पाहिजे, तथागतानीं तमाम मानवजातीला दिलेले, पंचशील, अष्टांगिकमार्ग, दसशील दहा पारमितेची या सर्व परमितेचे शिकवण दिली असल्याचे तें म्हणाले.
कार्यक्रमांच्या यशस्वीतेंसाठी धम्ममित्र गौरी कांबळे, प्रजाताई कांबळे, किरण गायकवाड, सुरेश कांबळे, शाहूराज गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, राजेंद्र सूर्यवंशी, डिगंबर सोनकांबळे, परमेश्वर गायकवाड, संजय कांबळे, राजेंद्र कांबळे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुशीद्र कांबळे यांनी केलें. कार्यक्रमांस धम्म उपासक मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *