व्यापारी संघटनेकडून नगरपंचायत प्रशासनाचा निषेध
गडचिरोली : भामरागड ता.२२- येथे दि.२६ ते २८मे २०२२ दरम्यान माडिया सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन आदिवासी विvकास प्रकल्पांतर्गत करण्यात आले आहे.सदर महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते होणार आहे.राज्यपालाच्या दौऱ्यानिमित्य राजशिष्टाचाराचे पालन करण्याचे दृष्टीने सर्व सार्वजनिक रस्ते,जागा रिकाम्या राहणे महत्त्वाचे असून सार्वजनिक रस्ते,नाली, जागेवरील प्रक्षेपण, अडथळा वा अतिक्रमण काढणे महत्त्वाचे असल्याचे कारण देऊन नगरपंचायत प्रशासनाने व्यावसायिकांना नोटीस दिली होती.लोकांनी मुख्य नाली पलिकडील अतिक्रमण काढले.मात्र नगरपंचायत प्रशासनाने जबरण पोलिस बंदोबस्तात नालीच्या अलिकडीलही साधे व टिनाचे बांधकाम हटविले.त्यामुळे येथील व्यापारी संघटनेनी नगरपंचायत प्रशासनाचा निषेध केला आहे.

त्रिवेणी व्यापारी संघटना भामरागड कडून महामहिम राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपंचायतनी दिलेल्या नोटीसी प्रमाणे तात्पुरत्या स्वरूपाचे व्यवसाय नालीच्या समोर असलेले अतिक्रमण हटविणे होते.परंतु नोटीस मध्ये नालीच्या अलिकडील शेड काढणे नमुद नव्हते.तरी आज दि.२१/०५/२०२२ रोजी नगरपंचायत प्रशासनाकडून नगरपंचायतचे नाहरकत प्रमाणपत्र असतांनाच सुद्धा नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ.सुरज जाधव यांनी पोलिसांच्या बंदोबस्तात व जेसीबीच्या सहाय्याने बाजारपेठेतील काही शेड तोडून अस्ताव्यस्त करून ठेवले आहे.न.पं. प्रशासनाचा असा मनमानी कारभार केव्हा पर्यंत चालणार?असा प्रश्नही विचारण्यात आला आहे.

त्रिवेणी व्यापारी संघटननेच्या वतीने न.पं.प्रशासनाचा निषेध करण्यात आला.मुख्याधिकारी डॉ.सुरज जाधव यांनी धोकाघडी म्हटले आहे.याबाजार पेठेत झालेल्या नुकसान ग्रस्त भागाचे पहणीसाठी आमदार धर्मरावबाबा आत्रम यांनी दखल घेऊन तात्काळ भेट देण्याची सूचनेनुसार माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी भामरागडला धावते भेट दिले.नुकसान ग्रस्त घरे व दुकानांची प्रत्यक्ष पहाणी केले. वापाऱ्यांशी सकारात्मक चर्चाकरुन त्यांच्या मागणी ऐकुन घेतले.लगेच जिल्हाधिकारी सोबत फोनवर चर्चा केली भामरागड मुख्याधिकारी सुरज जाधव यांचे वर कारवाई करण्याची मागणी केली.उध्या योग्य चौकशी करुन कारवाई करण्याची निर्णय घेऊ आसे जिल्हाधिकारी यांनी आस्वासन दिले.