गडचिरोली : वाढत्या तंत्रज्ञानामुळे अनेक कलांसह हस्तकालाही लुप्त होत चालली आहे.याचे थेट संबंध रोजगारावरही पडत असून स्वयं रोजगार देणारी ही कला भविष्यात पूर्णत संपुष्टात येण्याची भीतीही आता निर्माण झाली आहे.त्यामुळे स्थानिक पातळीवर हस्तकलेच्या माध्यमातून लघु उद्योगांचे पुनर्जीवन करणे गरजेचे असून हस्तकलेला जिवंत ठेवण्यासाठी कौशल्य विकासाचे कार्यक्रम नियमित घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,भामरागड च्या वतीने “माडिया सांस्कृतिक महोत्सव 2022” चे आयोजन गुरुवारी 26 मे रोजी करण्यात आले होते.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी उदघाटक म्हणून नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ माधवी खोडे,प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री विजेते फोटोग्राफर सुधाकर ओळवे, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीना,माजी आमदार तथा प्रकल्पस्तरीय विकास समितीचे सदस्य नामदेवराव उसेंडी,माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम,अहेरीचे पं स सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता,प्रकल्प अधिकारी श्री अंकित,अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुज तरे, उप वनसंवरक्षक आशिष पांडे,तहसीलदार अनमोल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आ धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की,आपल्या रोजच्या जगण्यात निसर्गाचे संवर्धन करणाऱ्या आदिवासींसाठी जंगल ही देवभूमी आहे.निसर्गाच्या ऱ्हासात लोप पावत चाललेल्या औषधी वनस्पतींपासून तर,बांबूच्या झाडू पर्यंत अशा विविध संस्कृती व कलांचे दर्शन अशा प्रदर्शनातच घडते. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या वस्तूंचा व खाद्यपदार्थांचा या महोत्सवात विशेष आकर्षण असून याशिवाय पारंपरिक जाडीबुटीची औषधींचा प्रदर्शन करण्यात आला आहे.एवढेच नव्हेतर,या भागातील आदिवासी युवकांमधील क्रीडा कौशल्य बाहेर काढून त्यांना दिशा देण्यासाठी या महोत्सवात क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.अशा महोत्सवातून आदिवासींच्या विविध कलागुणांना वाव मिळणार असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.मात्र,स्थानिक पातळीवर तयार केलेल्या वस्तूंना चांगला भाव मिळावा यासाठी जर बाजारपेठ उपलब्ध द्यावा अन्यथा मार्केटिंगची व्यवस्था आदिवासी विकास विभागाने केल्यास याठिकाणी रोजगाराचा प्रश्न सुद्धा मिटणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.विभागीय आयुक्त आणि लोकप्रतिनिधींनी धरला ठेका या महोत्सवाचे उदघाटन होताच रेला नृत्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी विभागीय आयुक्त माधवी खोडे, जिल्हाधिकारी संजय मीना आणि मान्यवरांनी पारंपरिक नृत्यावर ठेका धरला.त्यात आ. धर्मराव बाबा आत्राम आणि भाग्यश्रीताई आत्राम यांनी सुद्धा रेला नृत्यात सहभाग घेऊन ठेका धरले हे विशेष.विविध स्टॉल ला दिली भेट माडिया सांस्कृतिक महोत्सवात हस्तकला,पारंपरिक खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले.यावेळी स्टॉल मधील हस्तकलेचे विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांचे पाहणी केले.