उस्मानाबाद : नळदुर्गच्या अलियाबाद स्मशानभूमीचे काम रखडल्याने येत्या पावसाळ्यात अंत्यविधी साठी लोकांची गैरसोय होणार होती अंत्यसंस्काराचे ठिकाण उघड्यावर असल्याने पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना पाऊस सुरू झाला तर विटंबना होऊ शकते ही बाब लक्षात घेता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस श्रमिक पोतदार यांनी अलियाबाद येथील हिंदू स्मशानभूमीचे काम पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न केले होते.

दि. 17 मे 2022 रोजी नळदुर्ग नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांना निवेदन देऊन अलियाबाद येथील हिंदू स्मशानभूमीचे काम सुरू करणे व स्मशानभूमीत लाईट ची सोय करावी या दोन मागण्या केले होते. अलियाबाद येथील स्मशानभूमीचे काम गेल्या सहा महिन्यांपूर्वी टेंडर प्रक्रिया पूर्ण करून त्याचे वर्कऑर्डर देखील दिलेले होते पण सहा महिने उलटूनही काम अद्याप सुरू झाले नव्हते तसेच रात्रीच्या वेळी लाईट ची सोय नसल्याने येथे अंधार पडत होता त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत होती ही बाब मुख्याधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देऊन स्मशानभूमीचे काम पावसाळ्या अगोदर झाले नाही तर अंत्यसंस्कार करणे अशक्य होईल त्यामुळे हे काम सुरू करावे अशा मागणीचे निवेदन दिले होते

तसेच 10 दिवसात काम सुरू झाले नाही तर नप प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा ईशारा देखील दिला होता. या मागणीचे गांभीर्य ओळखून मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी 26 मे रोजी स्मशानभूमीत जाऊन वस्तुस्थिती पाहिली आणि संबंधित अधिकारी व कंत्राटदाराला तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. आदेशानुसार हिंदू स्मशानभूमीचे काम सुरू झाले आहे. तसेच दुसरी मागणी देखील पूर्ण करण्यासाठी नगरपालिकेने लाईट चे टेंडर प्रक्रिया पूर्ण केलेली असून लाईटची सोय देखील काही दिवसात होणार आहे. सदर स्मशानभूमीचे काम पूर्ण होण्यासाठी किमान एक ते दीड महिना कालावधी लागणार असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तात्पुरत्या स्वरूपात शेड मारून अंत्यसंस्काराची सोय नगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती श्रमिक पोतदार यांनी दिली. पोतदार यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे लवकरच काम सुरू होणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.