सचिन बिद्री,उमरगा:
वंजारी सेवासंघ महाराष्ट्र राज्य नविन प्रदेश कार्यकारणी २०२२- २०२५ नुकतीच जाहिर करण्यात आली असून प्रा गुणवंत जाधवर यांची महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.

गेल्या दहा वर्षापासून कार्यरत असलेल्या वंजारी सेवा संघाचे कार्य महाराष्ट्रातील कानाकोऱ्यापर्यंत पसरवण्याचे काम करण्यास आले आहे.या वंजारी सेवा संघाची राज्यस्तरीय बैठक ५ जून रोजी संपन्न झाली.या बैठकीत राज्यस्तरीय कार्यकारिणी २०२२-२०२५ बिनिरोध निवड करण्यात आली.राज्य कार्यकारणी मध्ये उमरगा येथील प्रा गुणवंत जाधवर यांची प्रदेश संपर्क प्रमुख या पदावर निवड करण्यात आली. प्रा गुणवंत जाधवर हे लोकमतचे पत्रकार आसून,मागील सहा वर्षापासून वंजारी सेवा संघात विविध पदावर कार्य करत सक्रिय कार्य केले आहेत. या कार्याची दखल घेऊन त्यांची वंजारी सेवा संघ महाराष्ट्रप्रदेश संपर्क प्रमुख यापदावर निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे पत्र वंजारी सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल जाधवर, प्रदेश कार्याध्यक्ष देवेंद्र बारगजे, प्रदेश महासचिव बाजी दराडे यांच्या स्वाक्षरीत देण्यात आले आहे.या निवडीद्दल प्रा जाधवर यांचे वंजारी सेवा संघ उमरगा अध्यक्ष सुनील बडे,सचिव प्रा दिलीप घुले, उस्मााबाद जिल्हा संघटक पांडुरंग लाटे आदींनी अभिनंदन केले.