महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण, जलसंपदा आणि महिला व बालकल्याण खात्याचे राज्यमंत्री मा.ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक,सातलिंग स्वामी यांची कन्या संजीवनी सातलिंग स्वामी हिने इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेत ८१.६७% टक्के गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादित केल्याने प्रहार जनशक्ती पक्ष्याच्या वतीने विशेष कौतुक होत आहे.

तिचे इ. १० वी पर्यंतचे शिक्षण इंडियन मॉडेल स्कूल, सोलापूर येथे झाले असून, महाविद्यालयीन शिक्षण ए डी जोशी ज्युनिअर कॉलेज, सोलापूर येथे झाले आहे.अभ्यासात सातत्य आणि चिकाटी हे संजिवनी चे वैशिष्ट्य असून ती “एनइइटी(नीट)” साठी तयारी करीत आहे. संजीवनी स्वामी हिने मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.या सुयशा बद्दल राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, शिवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष,प्रा.मनोहर धोंडे,ए.डी.जोशी महाविद्यालयाचे सचिव,अमोल जोशी तसेच प्रहार संघटनेचे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी,शिवा संघटनेचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर मित्रपरिवारातून कौतुक होत आहे.