औरंगाबाद : पतीसोबत भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या एका महिलेचे प्राण वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरुमे यांच्या तत्परतेमुळे वाचले. हा प्रकार साजापूर येथे उघडकीस आला.
पोलीस कॉलनी, साजापूर येथील कुसुम क्रुष्णा गिरी या महिलेला तीन मुली व एक मुलगा असून तिचा पती डाव्या पायाने अपंग आहे. त्यामुळे कुसुम ही मोलमजुरी करते. तिचा पती तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे कुसुम ही रागाच्या भरात धरणाच्या दिशेने आत्महत्या करण्यासाठी धावत होती. दरम्यान तिने ही हकीगत तिसगाव येथील भाऊ संतोष यास फोन करून सांगितले़.कुसुम ही आत्महत्या करण्यासाठी धरणावर गेल्याचे समजतात घाबरलेला तिचा भाऊ, भावजई व आईने तिच्या मदतीसाठी तिसगाव परिसरातील धरणाकडे धाव घेत ते तिचा शोध घेत होते. दरम्यान गणपती विसर्जन स्पॉट पाहण्यासाठी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी साजापूरचे पोलीस पाटील रशीदखान पठाण यांना साजापूर तलावावर या. असा निरोप देत गुरमे हे गणपती विसर्जनासाठी तीसगावचा तलाव पाहणी करण्यासाठी पोकॉ योगेश शेळके,स्वप्नील अवचरमल,राहुल रणविर यांच्यासह आले होते. त्याचवेळी त्यांना ही माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी तात्काळ साजापूर येथील पोलीस पाटील रशीदखा पठाण यांना फोन करून धरणावर कोणी महिला आत्महत्येचा प्रयत्न करते का? ते पाहण्यास सांगितले. त्याचवेळी कुसुम धावत आत्महत्या करण्यासाठी धरणाकडे येत होती. ते पाहून पोलीस पाटील रशीदखा पठाण व त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांनी महिलेस रोखले. तोपर्यंत पोलीस निरीक्षक संदीप हे घटनास्थळी पोहोचले. दरम्यान या महिलेची त्यांनी समजूत काढत तिला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले.
प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
Ntv न्युज मराठी, वाळुज औरंगाबाद.
मो.8484818400