पोलीस प्रशासना प्रती विश्वास व आपुलकीची भावना निर्माण व्हावी हाच उद्देश…

गोंदिया : दि. ३१/०८/२०२२ ते १०/०९/२०२२ रोजी पर्यंत गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे साजरा होत असलेल्या गणेश उत्सव निमीत्ताने गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील नागरिकांमध्ये पोलीस प्रशासना प्रती विश्वास व आपुलकीची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने मा. पोलीस अधिक्षक सा. गोंदियाश्री. विश्व पानसरे साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक सा. गोंदिया (कॅम्प देवरी ) श्री. अशोक बनकर साहेब यांचे संकल्पनेतुन तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी श्री. संकेत देवळेकर सा. आणि मा. ठाणेदार पो.स्टे. चिचगड श्री. शरद पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली देवरी तालुक्यातील पो.स्टे. चिचगड अंतर्गत सशस्त्र दुरक्षेत्र बोंडे कॅम्पमध्ये मुला-मुली करीता विविध स्परधेचे आयोजन करन्यात आले होते.

त्यात क्रिकेट स्पर्धा, महिला-पुरुष, मुला-मुली करीता चमचा गोळी, सुई धागा, संगीत खुर्ची, मटका फोड, रनींग, लांब उड्डी, गायन, निबंध, डान्स, अंताक्षरी, मेनबत्ती स्पर्धा, तसेच स्पर्धा परिक्षा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर देवरी तालुक्यातील स्पर्धेमध्ये बोंडे, घोनाडी, पळसगाव, धमदीटोला, खोबा, येथील संघाने भाग घेतला. दि. ३१/०८/२०२२ ते १०/०९/२०२२ रोजी पर्यंत एकुण १० दिवस विविध स्पर्धा घेण्यात येवुन वरील सर्व स्पर्धेतील स्पर्धकांचे प्रथम, द्वितीय, तृतीय.कमांक काढुन दिनांक ११/०९/२०२२ रोजी मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री. अशोक बनकर सा. गोंदिया कॅम्प देवरी व एओपी बोंडे चे प्रभारी अधिकारी श्री. राहुल दुधमल सा. यांचे हस्ते बक्षीश वितरण करण्यात आले.

सदर स्पर्धेमध्ये बोंडे, घोनाडी, पळसगाव, धमदीटोला येथील शालेय स्पर्धक ५०० विद्यार्थी यांनी भाग घेतले. व सदर शालेय स्पर्धकांना पोलीस विभागातर्फे शालेय साहित्य स्कुल बॅग, कंम्पास, पाणी बाटल, नोटबुक, चित्रकला बुक, डिक्सनरी, इंग्लीस स्पीकींग बुक, स्केच पेन, पेपर पॅड ईत्यादी साहित्य वाटप करण्यात आले. तसेच ६०० स्त्री- पुरुष स्पर्धक यांनी भाग घेतला. व पोलीस विभागातर्फे स्त्रीयांना साडी, हळदी कुंकु चे साहित्य, पाणी बाटल, तसेच बोंडे येथील भजन मंडळी यांना हार्मोनियम वादय, ढोल वाटप करण्यात आले. तसेच नवयुवक- युवतींना स्पर्धा परिक्षेबाबत व भरतीपुर्व प्रशिक्षणाबाबत माहीती देऊन शासनाच्या विविध योजनांबाबत माहीती देण्यात आली. तसेच गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित विविध प्रशिक्षण व रोजगार विषयक माहीती देण्यात आली. तसेच एओपी बोंडे येथे घेण्यात आलेल्या पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणा मधील मौजा- धमडीटोला येथील श्री. देविदास बागडेरिया यांची राज्य राखीव पोलीस बल गट क्र १३ देसाईगंज वडसा येथे नियुक्ती झाल्याने मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री. अशोक बनकर सा. गोंदिया कॅम्प देवरी यांचे हस्ते सत्कार करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला बोंडे, पळसगांव, धमडीटोला, घोनाडी, लक्ष्मीनगर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व नागरीक व म्हैसुली/बोंडे येथील उपसरपंच श्री. ईश्वरजी कोल्हारे व इतर सदस्य सह सशस्त्र दुरक्षेत्र बोंडे येथील पोलीस प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री. राहुल दुधमल, पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रकाश इंगोले सा.उपनिरीक्षक श्री रंजित मट्टामी, व आय. आर. बी. चे पोउपनि. गजानन वैद्य सा. सह बोंडे कॅम्प येथील कर्मचारी
स्टाफ उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *