गोंदिया : अभियांत्रिकी शाखा व वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विमाप्र व इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आपल्या जात पडताळणीचे प्रस्ताव आवश्यक कागतपत्रासह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गोंदिया यांच्याकडे तात्काळ सादर करावे असे आवाहन उपयुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया राजेश पांडे यांनी केले आहे.
इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी त्यांचे पुढील व्यावसायिक अभ्यासक्रमांतर्गत प्रवेश घेण्याकरीता केंद्रियभूत प्रवेश प्रक्रियेतंर्गत नीट, जेइइ व एमएचटीसीईटी या सारख्या प्रवेश परीक्षामध्ये सहभागी झालेत, त्यापैकी नीट, जेइइचा निकाल जाहिर झाला असून एमएचटीसीईटीचा निकाल १५ सप्टेंबर २०२२ ला वा त्यापूर्वी लागण्याची शक्यता आहे. या प्रवेश परिक्षेमध्ये अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विमाप्र व इमाव प्रवर्गातील जे मागासर्गीय विद्यार्थी प्रवेश पात्रता फेरीसाठी पात्र ठरले आहेत व ठरणार आहेत तसेच त्यांचे जाती दावा पडताळणीचे प्रस्ताव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया कार्यालयाकडे तृटी पूर्ततेकरीता प्रलंबीत आहेत व ज्यांना अद्याप जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाले नाहीत अशा विद्यार्थ्यांना त्यांचे तृटी पूर्ततेसांबंधी मेलवर कळविण्यात आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रकरणांत तृटी पूर्ततेसंबंधाने आवश्यक ते पुरावे व नीट, जेइइ, व एमएचटीसीईटीच्या त्यांचे निकालपत्राची प्रत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया कार्यालयाकडे तात्काळ सादर करावे. जेणेकरुन त्यांचे प्रकरणी तातडीने निर्णय घेणे सोयीचे होईल.
गोंदिया जिल्ह्यातील जे मागासवर्गीय विद्यार्थी नीट, जेइइ, व एमएचटीसीईटी सारख्या प्रवेश परिक्षेमध्ये प्रवर्ग निहाय पात्र ठरले आहेत व ज्यांनी अद्याप त्यांचे जाती दावा पडताळणीचे प्रस्ताव समिती कार्यालयाकडे सादर केले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी त्याचे प्रस्ताव ऑनलाईन, अर्ज, आवश्यक पुरावे व नीट, जेइइ, व एमएचटीसीईटीच्या निकालपत्रासह त्वरीत सादर करावे, असे आवाहन उपयुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया राजेश पांडे यांनी केले आहे.