वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्याला मारहान केल्याचा प्रकरन…

गोंदीया:-
गोंदिया जिल्हयाच्या देवरी प्रकल्प अधिकारी कार्यलया अंतर्गत येणाऱ्या बोरगाव आदिवासी आश्रम शाळेतील पाचव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थाला शिक्षकाने मारहाण केली असल्याने विद्यार्थांच्या डोक्यावर मार लागलेला आहे. त्यामुळें प्रकल्प अधिकारी राचेलवार यानीं तात्काळ संबधीत शिक्षकाला निलंबित केले आहे.

देवरी तालुक्यात आदिवासीं विभागा अंतर्गत शासकिय आश्रम शाळा चालविल्या जात आहेत.
बोरगाव येथे निवासी शाळा असल्याने आदिवासीं विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. पण पाचव्या वर्गात शिकत असलेल्या अक्षय पंधरे या विद्यार्थ्याला ठेंगरे नामक शिक्षकाने मारहाण केली त्यामूळे अक्षय याच्या डोक्याला मार लागला. अक्षयने संपुर्ण घटना आपल्या घरच्या लोकांना सांगीतले असताना घरच्या लोकांनी प्रकल्प कार्यालयात शिक्षका विरुध्द तक्रार दाखल केली. त्यामुळें प्रकल्प अधिकारी राचेलवर यांनी तात्काळ शाळेत पोहचत विद्यार्थ्याला उपचारा करीता रूग्णालयात पाठवत चौकशी केली असता ठेंगरे या शिक्षकाला निलंबित केले आहे. तर शासन आदिवासीं आश्रम शाळेवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही विद्यार्थ्यांवर असा पद्धतीने वागणूक मिळत असेल तर असा शिक्षकांवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सतत विद्यार्थांवर येत असलेल्या प्रसंगामुळे शिक्षकावर वचक कुनाचे हा प्रश्न निर्मान होत होता. परंतु प्रकल्प अधिकारी यांच्या कारवाईने पालक वर्गात आनंदाचे वातावरन निर्मान झाले आहे. बोरगाव बाजार येथिल आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाकडे संपुर्ण लक्ष दिले जाते. विद्यार्थांसाठी आदिवासी विकास विभागाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. मात्र, असा शिक्षकांमुळे आश्रम शाळेला गालबोड लागल्या जातो. संबधीत शिक्षकाला या अगोदरही अनेकदा शोकास बजविन्यात आले होते पंरतु सततच्या तक्रारी, शिक्षकाच्या वागनुकीमुळे व विद्यार्थाला मारहान प्रकरना मुळे त्या शिक्षकाला प्रकल्प अधिकारी यानीं तात्काळ निलंबीत केले आहे.

प्रतिक्रीया
सदर शिक्षकाला या अगोदरही कार्यमुक्त केले होते. त्यानंतर माफी नामा घेत काही दिवसानी त्याला पुन्हा रुजु करन्यात आले. परतुं त्याच शिक्षकाने विद्यार्थाला मारहान केल्याची घना घडली . लगेच बोरगाव आश्रम शाळेला भेट देत चौकशी केली व त्या शिक्षकाला निलंबीत केले आहे.

 विकास राचेलवार (प्रकल्प अधिकारी, गोंदिया)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *