गोंदिया : अलीकडच्या काळात वाढदिवस साजरा करणे हा खूप मोठा इव्हेंट झाला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने खूप मोठा खर्चही केला जातो. परंतु, देवरी तालुक्याच्या शेडेपार ग्रामपंचायतचे सरपंचा माधुरी लाखन राऊत यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून स्थानीक शेडेपार येथिलच जिल्हापरिषद शाळेच्या विद्यार्थानां शालेय साहित्य वाटप केले आहे.
वाढदिवस साजरा करताना नागरिक विनाकारण अवाढव्य खर्च करत असतात. हा अनावश्यक खर्च टाळून आपण समाजासाठी काही तरी देणे असते. या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत माधुरी राऊत यांनी शाळेतील विद्यार्थ्यानां त्यांच्या शिक्षनात मदत होईल अस्या नोटबुक, पेन, पेन्सील व साहीत्य किटचे वाटप केले.तसेच त्यांनी विद्यार्थ्यांच्या अल्पोहाराचीही व्यवस्थाही केली. यावेळी गावातील पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रतिक्रीया
नागरिकांनी वाढदिवसासाठी होणारा अनावश्यक खर्च टाळून समाजातील गरजू, आर्थिक मागास आणि दुर्लब घटकातील नागरिकांना जीवनाश्यक वस्तू भेट स्वरूपात द्याव्यात. व विद्यार्थानां मदत करावी जेने करुन त्यांच्या शिक्षनाचा व्याप वाढेल.-सौ. माधुरी राऊत (सरपंचा शेडेपार)