११८ राशन कार्ड धारका पैकी १०० राशन कार्ड धारकानीं केली तहसीलदार यानां मागणी…
गोंदिया : तालुक्यातील मौजा लेडींजोब येथील धनलाल धानगुन यांच्या कडे स्वस्त धान्य दुकान आहे. मागील कित्येक वर्षांपासून गावात नियमितपणे राशन वाटप करण्यात येत आहे. पण गावातील १८ राशन कार्ड धारकांनी राशन दुकानदार राशन वाटत नसल्याचे खोटे कारण देत अन्नपुरवठा अधिकारी देवरी यानां निवेदन सादर केले होते. त्यावर त्याच गावातील १०० राशन कार्ड धारकानी देवरी अन्नपुरवठा अधिकारी व तहसीलदार यानां आज (दि.२०) निवेदन सादर केले की लेडींजोब येथील राशन दुकान ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत ठेवण्यात यावे या आशयाचे पत्र १०० राशन कार्ड धारकाच्या सहीनीसी देण्यात आले आहे.
मौजा लेडिंजोब येथील धनलाल धानगुन यांच्या नावे स्वस्त धान्य मागील अनेक वर्षापासून आहे. गावातील सर्व नागरिकांना नियमितपणे व शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजनांचे राशन वाटप करण्यात येत आहे. मात्र लेडींजोब गावातील १८ राशन कार्ड धारकानीं अन्न पुरवठा अधिकारी यांना तक्रार दाखल केली होती की, राशन वाटपात नियमानुसार होत नाही. आमचे राशन कार्ड दुसर्या राशन दुकानदाराकडे करुन देन्याची मागनी केली होती. त्यावर बाकी राशन कार्ड धारकानीं तहसीलदार यांच्यासी चर्चा करीत त्या १८ राशन कार्ड धारकानां दुसर्या दुकानदाराकडे करुन द्याव व लेंडीजोब येथिल जे राशन दुकानादार (धनलाल धानगुन) आहेत त्यांच्या कडेच ते राशन दुकान ठेवन्यात यावे असे निवेदन तहसीलदार व अन्न पुरवठा अधिकारी देवरी यांना सादर करत गावातील तेच स्वस्त धान्य दुकान ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत ठेवण्यात यावे अन्यथा १०० ही राशन कार्डधारक तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसण्यार असल्याचा इशारा निवेदनाच्या माध्यमानी देण्यात आला आहे.

निवेदन देते वेळी सरपंच राजेंद्र बिसेन, पोलिस पाटील आनंदराव मानकर, योगेश भोंडेकर, तेजराम भोंडेकर, हिवराज फापनवाडे, हितेश वट्टी, भास्कर धानगुन, नरेश मडावी, रविंद्र वट्टी, खेमराज करचाल, ललीत दाने, तेजराम गावराने, जैपाल धानगुन, दुर्योधन करचाल, प्रल्हाद भोंडेकर, प्रकाश भोंडेकर, संपत खोटोले, चंदन फरदे, प्रभुदास फापनवाडे, समनलाल मडावी, रमेश फरदे, दिनेश भोंडेकर, भरत धानगुन, भागवत राऊत, रामलाल मानकर, चैतराम भोंडेकर, हरिराम दाने, प्रकाशा भोंडेकर, प्रल्हाद भोंडेकर, आदी उपस्थित होते.
प्रतिक्रीया
लेडींजोब येथिल १०० लोकांच्या सहिने देवरी तहसील कार्यालयात निवेदन सादर केले आहे की, ज्या राशन दुकान दाराकडे राशन दुकान आरे त्याच राशन दुकान दाराकडे स्वस्त धान्य दुकान राहुद्यावे. त्यावर तालुका अन्नपुरवठा अधिकारी यानीं चौकशी करुन राशन कार्ड धारकानां सुलभ होईल अस्या पद्धतीने मार्ग काढुन देन्याचे आदेश देण्यात आले आहेत.-अनिल पवार ( तहसीलदार देवरी)